भारतीय क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८


भारतीय क्रिकेट संघ २ टी२० सामन्यांची मालिका खेळण्याकरिता आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. मालिकेतील दोन्ही सामने डब्लिनमध्ये होतील. पुरूषांच्या दुसऱ्या सामन्याच्या आदल्या दिवशी आयर्लंड महिला बांग्लादेश महिलांसोबत एक टी२० सामना खेळेल. भारताच्या दौऱ्याआधी आयर्लंड संघ नेदरलँड्स आणि स्कॉटलंड बरोबर एका तिरंगी मालिकेत खेळला.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
आयर्लंड
भारत
तारीख २७ – २९ जून २०१८
संघनायक गॅरी विल्सन विराट कोहली
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा जेम्स शॅनन (६२) रोहित शर्मा (९७)
सर्वाधिक बळी पीटर चेस (५) कुलदीप यादव (७)
मालिकावीर युझवेंद्र चहल (भारत)

भारतीय क्रिकेट संघाने याआधी २००७ मध्ये दौरा केला होता तो एक एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ज्या सामन्यात भारताने आयर्लंडवर ९ गडी राखून विजय मिळविला.

संघ संपादन

  आयर्लंड   भारत[१]

जोशुआ लिटीलला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी डेव्हिड डेलानीला संघात स्थान दिले गेले.

टी२० मालिका संपादन

१ला टी२० सामना संपादन

२७ जून २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
२०८/५ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१३२/९ (२० षटके)
रोहित शर्मा ९७ (६१)
पीटर चेस ४/३५ (४ षटके)
जेम्स शॅनन ६० (३५)
कुलदीप यादव ४/२१ (४ षटके)
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
  • भारताचा हा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होय.


२रा टी२० सामना संपादन

२९ जून २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
२१३/४ (२० षटके)
वि
  आयर्लंड
७० (१२.३ षटके)
लोकेश राहुल ७० (३६)
केविन ओ'ब्रायन ३/४० (४ षटके)
गॅरी विल्सन १५ (१८)
कुलदीप यादव ३/१६ (२.३ षटके)
  भारत १४३ धावांनी विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि ॲलन नील (आ)
सामनावीर: लोकेश राहुल (भारत)
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : सिद्धार्थ कौल (भा)


संदर्भ संपादन

  1. ^ "Team India Selection: Rahane to Lead Against Afghanistan; Shreyas Iyer, Ambati Rayudu and Siddarth Kaul Included for England ODIs".