उबुंटू

डेबियन-आधारित लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम
(Ubuntu Linux या पानावरून पुनर्निर्देशित)


उबुंटू अथवा उबुंटू लिनक्स ही एक लोकप्रिय लिनक्स प्रणाली आहे. उबुंटूचे वैशिष्ट्य म्हणजे ही संगणकप्रणाली सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याचे मुख्य कार्यालय आयले ऑफ़ मॅन येथे आहे. दक्षिण आफ्रिकेमधील प्रसिद्ध अब्जाधीश मार्क शटलवर्थ ह्याच्या प्रोत्साहनातून आणि त्याच्या कॅनोनिकल लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रायोजनातून उबुंटुचा विकास केला गेला आहे. स्थापना करण्यास सोपी, वापरण्यास सोपी आणि नियमित निघणाऱ्या आवृत्त्या अशी उबुंटूची वैशिष्ट्ये आहेत. ही संगणकप्रणाली मोफ़त असून, त्यात जीनोम हे ठिय्या वातावरण वापरले गेले आहे. याशिवाय के डेस्कटॉप मॅनेजर वापरून कुबुंटु, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एडुबुंटु, हलकाफुलका एक्ससीएफई विंडो मॅनेजर वापरणारा क्सुबुंटु अशी उबुंटुची अनेक भावंडे आहेत.

उबुंटू लिनक्स
उबुंटू लिनक्स
प्रारंभिक आवृत्ती २० ऑक्टोबर २००४
सद्य आवृत्ती १३.१० (सॉसी सॅलॅमॅंडर)
(१७ ऑक्टोबर २०१३)
सद्य अस्थिर आवृत्ती ट्रस्टी टार अंतिम बीटा
(२७ मार्च २०१४)
विकासाची स्थिती सद्य
प्रोग्रॅमिंग भाषा सी, पायथॉन, पर्ल, रूबी, सी प्लस प्लस
प्लॅटफॉर्म आयए-३२, एक्स८६-६४, स्पार्क, पॉवरपीसी, एआरएम, आयए-६४
भाषा ५५ पेक्षा अधिक
सॉफ्टवेअरचा प्रकार ऑपरेटिंग सिस्टिम
सॉफ्टवेअर परवाना गनू/जीपीएल
संकेतस्थळ उबुंटू.कॉम

उबुंटुचे नामकरण हे दक्षिण आफ्रिकेतील एका कल्पनेवरून करण्यात आले आहे. "इतरांप्रती मानवता" असे ह्या कल्पनेचे ढोबळ वर्णन करता येईल. "आपण आहोत ते इतरांमुळे आहोत" अथवा "आपण सगळे जसे आहोत तसाच मी आहे." अशीही ह्या कल्पनेची काही विवेचने सुचवण्यात आली आहेत.

उबुंटू पॅकेजेस

संपादन

उबुंटूमध्ये असलेली सॉफ्टवेर पॅकेजेस चार मुख्य गटांमध्ये विभागलेली आहेत. हे गट पुढीलप्रमाणे आहेत.

  • मुख्य (main): ह्या गटात उबुंटू टीमकडून सहाय्य दिली जाणारी व पूर्णपणे मुक्त असलेली सॉफ्टवेर पॅकेजेस अंतर्भूत केलेली आहेत
  • निर्बंधित (restricted): ह्या गटात उबुंटू टीमकडून सहाय्य दिली जाणारी परंतु पूर्णपणे मुक्त नसलेली सॉफ्टवेर पॅकेजेस अंतर्भूत केलेली आहेत. या पॅकेजेस संदर्भातील सर्वच समस्या उबुंटू टीम दुरुस्त करू शकत नसली तरी त्या त्या पॅकेजच्या संपादकांकडे उबुंटू टीम समस्या दुरुस्तीला पाठवण्याचे काम करते.
  • वैश्विक (universe): ह्या गटात उबुंटू टीमकडून सहाय्य दिल्या न जाणाऱ्या मुक्त स्रोत सॉफ्टवेर पॅकेजेसचा समावेश होतो.
  • बहुवैश्विक (multiverse): ह्या गटात उबुंटू टीमकडून सहाय्य दिल्या न जाणाऱ्या आणि मुक्त किंवा ओपन सोर्सचा परवाना नसलेल्या सॉफ्टवेरचा समावेश होतो.

Code

इतर लिनक्स प्रणाली

संपादन

संकेतस्थळे

संपादन