ॲगाथा क्रिस्टी

(ॲगाथा ख्रिस्ती या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲगाथा मेरी क्लॅरिसा, लेडी मॅलोवान, तथा अगाथा ख्रिस्ती (जन्म : टॉर्की (इंग्लंड), १५ सप्टेंबर १८९०; - चोल्सी (इंग्लंड), १२ जानेवारी १९७६ ही इंग्लिश भाषेत लिखाण करणारी लेखिका होती.

ॲगाथा ख्रिस्ती
टॉरे ऍबी, टॉर्की येथील ॲगाथा ख्रिस्तीचा स्मृतिफलक
जन्म सप्टेंबर १५, १८९०
टॉर्की, डेव्हन, इंग्लंड
मृत्यू जानेवारी १२, १९७६
चोल्सी, ऑक्सफोर्डशायर, इंग्लंड
राष्ट्रीयत्व इंग्लिश इंग्लंड ध्वज इंग्लंड
कार्यक्षेत्र कादंबरीकार
साहित्य प्रकार रहस्यकथा
प्रभाव एडगर ऍलन पो, आर्थर कोनन डॉयल
संकेतस्थळ agathachristie.com

ॲगाथा ख्रिस्तीने मेरी वेस्टमॅकॉट नावानेही लेखन केलेले आहे, परंतु तिने लिहीलेल्या हरक्युल पॉयरॉमिस मार्पल या काल्पनिक सत्यान्वेषी नायक/मदतनीस मध्यवर्ती असलेल्या रहस्यकथां कथांनी तिला क्वीन ऑफ क्राईम अशी पदवी मिळवून दिली. तिने नंतरच्या अनेक रहस्यकथा लेखकांना प्रभावित केले.

ॲगाथा ख्रिस्तीच्या अनेक कादंबऱ्या मधुकर तोरडमल आणि रेखा देशपांडे यांनी मराठीत अनुवादित केल्या आहेत. या कादंबऱ्या एकूण पाच संचांत आहेत. त्याशिवाय,

अनिल गुजर यांनीही ॲगाथा ख्रिस्तीच्या एका कादंबरीचा 'थोडक्यात चुकलं' या नावाचा अनुवाद केला आहे..

अगाथाच्या 'हिकरी डिकरी डॉक' या पुस्तकाचा अनुवाद मंजिरी जोशी हिने केला आहे.

सविता दामले हिने अगाथा ख्रिस्तीच्या 'द क्रुकेड हाऊस' या कादंबरीचा अनुवाद केला आहे.

अपर्णा भावे हिने 'मृत्युचं सावट' लिहिली आहे (मूळ कादंबरीकार अगाथा ख्रिस्ती).

अगाथा ख्रिस्तीच्या इंग्रजी कादंबऱ्या

संपादन
  1. The Adventure of the Christmas Pudding
  2. The Big Four
  3. Curtain poirot's last case
  4. द क्रुकेड हाऊस
  5. Five Little Pigs
  6. हिकरी डिकरी डॉक
  7. The Hollow
  8. The Hound Of Death
  9. द लेबर्स ऑफ हर्क्युलस
  10. The Man In The Brown Suit
  11. The Mirror Crack’d from Side to Side
  12. The Murder On The Links
  13. The Mysterious Mr. Quin
  14. Ordeal By Innocence
  15. Peril at End House
  16. The Secret Of Chimneys
  17. Three Act Tragedy
  18. While The Light Lasts
  19. Witness for the Prosecution