३एम ही अमेरिकेत मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी स्कॉच टेप, टेफ्लॉन आवरणे सह ५५,००० पेक्षा जास्त उत्पादने जगभरात विकते. या कंपनीचे ६५ देशांमध्ये ८८,००० कर्मचारी असून मुख्यालय मिनेसोटा राज्यातील मेपलवूड शहरात आहे.

या कंपनीचे याआधीचे नाव मिनेसोटा माइनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग होते.