२०२२ स्टॅन नागय्या चषक

मलेशिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सिंगापूराचा दौरा केला. मालिकेला २०२२ स्टॅन नागय्या चषक नाव दिले गेले. स्टॅन नागय्या चषक स्पर्धेची ही चौवीसावी आवृत्ती होती. आणि प्रथमच चषकाला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा दिला गेला. सर्व सामने इंडियन असोसिएशन मैदान येथे खेळविण्यात आले. सिंगापूरने हे सामने २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब स्पर्धेच्या तयारीसाठी खेळले. तर मलेशियाने नंतर त्यांच्या मायदेशात चौरंगी मालिकेचे आयोजन केले.

२०२२ स्टॅन नागय्या चषक
सिंगापूर
मलेशिया
तारीख २८ – ३० जून २०२२
संघनायक अमजद महबूब अहमद फियाज
२०-२० मालिका
निकाल मलेशिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा जनक प्रकाश (९९) मुहम्मद स्याहादत (७६)
सय्यद अझीज (७६)
सर्वाधिक बळी आर्यमान सुनील (४) अन्वर रहमान (६)

सिंगापूरने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. परंतु नंतर अनपेक्षितपणे शेवटचे दोन्ही सामने मलेशियाने जिंकले आणि स्टॅन नागय्या चषक २-१ ने जिंकला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२८ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मलेशिया  
१३७/७ (२० षटके)
वि
  सिंगापूर
१३८/६ (२० षटके)
शर्विन मुनैंदी ४० (३६)
अनंत कृष्णा ३/१८ (४ षटके)
आर्यमान सुनील ३६* (२०)
पवनदीप सिंग ३/१३ (४ षटके)
सिंगापूर ४ गडी राखून विजयी.
इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर
पंच: हरदीप जडेजा (सिं) आणि आनंद नटराजन (सिं)
सामनावीर: आर्यमान सुनील (सिंगापूर)
  • नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.
  • अक्षय पुरी (सिं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
२९ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मलेशिया  
१७७/५ (२० षटके)
वि
  सिंगापूर
१५४/६ (२० षटके)
सय्यद अझीज ५६ (३९)
जनक प्रकाश २/३८ (४ षटके)
जनक प्रकाश ५६ (३१)
अन्वर रहमान २/१६ (४ षटके)
मलेशिया २३ धावांनी विजयी.
इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर
पंच: सतीश बालसुब्रमण्यम (सिं) आणि रेशांत सेल्वरत्नम (सिं)
सामनावीर: मुहम्मद स्याहादत (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • मलेशियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

३रा सामना

संपादन
३० जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सिंगापूर  
१२२/७ (१३ षटके)
वि
  मलेशिया
१२५/५ (१२.१ षटके)
शर्विन मुनैंदी २६* (९)
आर्यमान सुनील ३/३३ (३ षटके)
मलेशिया ५ गडी राखून विजयी.
इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर
पंच: सेंथील कुमार (सिं) आणि प्रमेश परब (सिं)
सामनावीर: शर्विन मुनैंदी (मलेशिया)
  • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १३ षटकांचा करण्यात आला.
  • अमन देसाई (सिं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.