२०१२ दिल्ली सामूहिक बलात्कार

दिनांक १६ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी ज्योती सिंग पांडे,[] या दिल्लीतील भौतिकोपचार (इंग्लिश: Physiotherapy )[] शिकणाऱ्या मुलीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये हल्ला केला व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तेरा दिवसांनी तिचा सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला, जिथे तातडीचे उपचार करण्यासाठी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून हलविण्यात आले होते.

२०१२ दिल्ली सामूहिक बलात्कार
इंडिया गेट येथे जमा झालेले निषेधक
दिनांक १६ डिसेंबर, इ.स. २०१२
वेळ रात्री ९:५४ भारतीय प्रमाण वेळ (UTC+05:30)
स्थळ दिल्ली, भारत
मृत्यू १ (२९ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी)
आरोप बलात्कार, खून, अपहरण, चोरी, हल्ला[]

ज्योती व तिचा मित्र दक्षिण दिल्लीमध्ये चित्रपट पाहून रात्री घरी परतत होते. सार्वजनिक बस समजून बाजूने जाणाऱ्या एका अनधिकृत बसमध्ये ते चढले. त्या बसमध्ये त्यांच्याशिवाय चालक व इतर पाच व्यक्ती, ज्यानां २० मार्च २०२०ला सकाळी ५.३०ला फाशी झाली. बसचालकाचे मित्र होते, हे प्रवास करत होते. बस योग्य दिशेने जात नसल्याचे कळल्यावर ज्योती व तिचा मित्राने त्याबद्दल विचाराले. मात्र त्यावर इतर प्रवाशांनी तिला व तिच्या मित्राला एका लोखंडी सळीने मारले व नंतर गाडीच्या मागच्या बाजूला तिच्यावर सामूहिक बलात्कार केला व नंतर त्यांना जखमी अवस्थेत बसमधून फेकून दिले.

तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या हल्यात तिच्या लहान आतड्यांना इजा झाली होती व त्यामुळे ते काढून टाकावे लागले. २६ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी तिला पुढील उपचारासाठी सिंगापूरला हलविले गेले मात्र तिथे तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला.

या बलात्काराचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पडिसाद पडले. दिल्ली व भारतातील इतर ठिकाणी अनेक मोर्चे काढले गेले व निषेध नोंदवला गेला, यातील काही मोर्च्यांमध्ये सुरक्षा यंत्रणेवर हल्ले केले गेले. त्या सहाही जणांना हल्ला व बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे व त्यांच्यावर फास्ट ट्रॅक (इंग्लिश: Fast Track) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले गेले आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ Gardiner Harris. "Murder Charges Are Filed Against 5 Men in New Delhi Gang Rape". 3 January 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Nada Farhoud, Jalees Andrabi. "India gang rape victim's father: I want the world to know my daughter's name is Jyoti Singh Pandey". 6 January 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "IAP condoles death of Delhi gang-rape victim". नवी दिल्ली. २९ डिसेंबर २०१२. 2013-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० डिसेंबर २०१२ रोजी पाहिले.