१९७१ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा १५ ते २४ ऑक्टोबर, इ.स. १९७१ दरम्यान स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामध्ये खेळवली गेली. १० देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीमध्ये स्पेनचा पराभव करून पहिले अजिंक्यपद मिळवले. भारतीय हॉकी संघ तिसऱ्या क्रमांकावर होता.

१९७१ हॉकी विश्वचषक
Hockey Copa del Mundo 1971
स्पर्धा माहिती
यजमान देश स्पेन ध्वज स्पेन
शहर बार्सिलोना, कातालोनिया
संघ १०
पहिले तीन संघ
विजयी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१ अजिंक्यपद)
उपविजयी स्पेनचा ध्वज स्पेन
तिसरे स्थान भारतचा ध्वज भारत
स्पर्धा तपशील
सामने 30
गोल संख्या 66 (सरासरी 2.2 प्रति सामना)
(पुढील) १९७३