होळकरवाडी
होळकरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश केला गेलेला आहे.हवेली तालुक्यातील दक्षिणेस तालुक्यातील शेवटचे गाव आहे ,गावच्या दक्षिणेस कानिफनाथ डोंगर आहे,डोंगरापलिकडे पुरंधर तालुका सुरू होतो.
?होळकरवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | हवेली |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा मराठी | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ १२ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनहोळकरवाडी गावच्या दक्षिणेस कानिफनाथ गड मंदिर आहे,उंच डोंगरावर विलोभनीय असे भव्य मंदिर आहे ,नवनाथ संप्रदाय मधील एक नाथ - कानिफनाथ महाराज यांचे मदिर आहे.
याच डोंगराच्या पायथ्याशी पुरातन शिव पार्वती मंदिर आहे,या मंदिरामध्ये शिव आणि पार्वती अशी दोन्ही लिंग आहेत.अत्यंत सुरेख बांधकामामध्ये मंदिर बांधलेले आहे.मंदिरापासून जवळच पाझर तलाव आहे जुलै ते फेब्रुवारी मध्ये तलाव भरलेला असतो.याच काळात कानिफनाथ डोंगराचे निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते.
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनहोळकरवाडी गावच्या पूर्वेला वडकी, पश्चिमेला औताडे - हांडेवाडी, उत्तरेस शेवाळेवाडी-देवाची उरुळी, तर दक्षिणेस कानिफनाथ गड,आणि पूर्व पश्चिम पसरलेला डोंगर आहे.