हैदर अलिर्झा ओग्लु अलियेव (अझरबैजानी: Heydər Əlirza oğlu Əliyev, रशियन: Гейда́р Али́евич Али́ев; १० मे १९२३ - १३ डिसेंबर २००३) हा मध्य आशियामधील अझरबैजान देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. अझरबैजानच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेला अलियेव १९६९ ते १९८२ दरम्यान अझरबैजान सोसागमधील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक होता. १९९१ साली अझरबैजानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९३ ते २००३ दरम्यान अलियेव अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षपदावर होता. खराब प्रकृतीमुळे त्याने ऑक्टोबर २००३ मध्ये सत्ता सोडली व त्याचा मुलगा इल्हाम अलियेव ह्याला राष्ट्राध्यक्षपदावर नेमले.

हैदर अलियेव

अझरबैजानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२४ जून १९९३ – ३१ ऑक्टोबर २००३
मागील हैदर अलियेव
पुढील इल्हाम अलियेव

जन्म १० मे १९२३ (1923-05-10)
नाखचिवान, अझरबैजान सोसाग, सोव्हिएत संघ
मृत्यू १३ डिसेंबर, २००३ (वय ८०)
क्लीव्हलंड, ओहायो, अमेरिका
धर्म शिया इस्लाम
सही हैदर अलियेवयांची सही
बाकूमधील हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ

बाह्य दुवे संपादन करा