हॅरियेट टबमन
हॅरियेट टबमन तथा अरामिंटा रॉस (इ.स. १८२२:डॉर्चेस्टर काउंटी, मेरीलँड, अमेरिका - १० मार्च, इ.स. १९१३:ऑबर्न, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेतील गुलामीविरुद्ध लढणारी स्त्री होती.
टबमन अमेरिकन यादवी युद्धादरम्यान अमेरिकेच्या सैन्याची स्वंयस्फूर्त सैनिक, टेहळी आणि गुप्तहेरही होती.
टबमनचा जन्म गुलामांपोटी झाल्याने ती जन्मतः गुलाम होती. १७ सप्टेंबर, इ.स. १८४९ रोजी वयाच्या २७व्या वर्षी ती आपल्या भावांसह मालकाकडून पळून गेली परंतु लगेचच पकडली गेली. त्यांनतर काही दिवसांनी तिने एकटीने पुन्हा एकदा पळ काढला व अंडरग्राउंड रेलरोडद्वारे मुक्ती मिळवली. अंडरग्राउंड रेलरोड ही अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध गुप्तपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांची साखळी होती.
टबमनने आपल्या नंतरच्या आयुष्यात गुलामगिरीविरुद्ध अव्याहतपणे काम केले व १३ वेळा स्वतः पकडले जाण्याची जोखीम पत्करून सुमारे ७० गुलामांना मुक्ती मिळविण्यास मदत केली.
टबमन स्त्रीयांना मताधिकार मिळविण्यासाठीच्या आंदोलनातही सक्रिय होती.