हॅनिबल

(हॅनिबाल या पानावरून पुनर्निर्देशित)

हॅनिबल (इ.स. पूर्व २४७ - इ.स. पूर्व १८३/१८२) हा अतिप्राचीन कार्थेजेनियन साम्राज्याचा लष्करी अधिकारी होता. हॅनिबलला आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम लष्करी पुढारी मानण्यात येते.

हॅनिबलच्या संगमरवरी पुतळा

हॅनिबलच्या काळात भूमध्य भूभागात अत्यंत तणावाचे वातावरण होते. रोमन प्रजासत्ताकाने कार्थेज, सेल्युसिद साम्राज्य, सिराकुझा इत्यादी बलाढ्य सत्तांवर आपली हुकमत प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. मोठ्या हत्तींचा समावेश असलेली एक सेनेची संपूर्ण तुकडी इबेरियापासून पिरेनीजआल्प्स पर्वतरांगा पार करून उत्तर इटलीमध्ये सुखरूप नेणे ही हॅनिबलची एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. त्यानंतर हॅनिबलने इटलीमध्ये अनेक लढाया जिंकून तेथे सुमारे १५ वर्षे राज्य केले.

मात्र त्यानंतर सिपिओ नावाच्या रोमन सेनापतीने हॅनिबलच्या सैन्याचा दारुण पराभव केला. हॅनिबलला त्याच्याच इटली देशातून परागंदा व्हावे लागले. शत्रूच्या हाती सापडण्यापेक्षा विष घेऊन त्याने आपला शेवट करून घेतला.

शिवाजीच्या समकालीन प्रवाशांनी शिवाजीच्या शौर्याला आणि हॅनिबलच्या शौर्याला तुल्यबळ मानले आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: