हुल्लड मुरादाबादी
सुशीलकुमार चढ्ढा तथा हुल्लड मुरादाबादी (२९ मे, इ.स. १९४२:गुजरानवाला, पाकिस्तान - १२ जुलै, इ.स. २०१४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे एक हिंदी हास्यकवी होते.
फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात मुरादाबाद येथे आला. सुरुवातीला त्यांचा ओढा वीररसातील कविता लिहिण्याकडे होता, पण नंतर हास्यकवितेत त्यांना सूर सापडला. त्यांनी हास्यकवितांच्या मैफलींमध्ये लोकांना लोटपोट हसवले. १९६२ च्या सुमारास त्यांनी 'सब्र' या टोपणनावाने हिंदी कवितालेखनात पदार्पण केले. त्यानंतर मात्र त्यांचे नाव देशोदेशी पोहोचले. 'संतोष' व 'बंधनबाहो' या दोन चित्रपटांत त्यांनी भूमिकाही केल्या होत्या.
हुल्लड मुरादाबादी त्यांच्या कवितांमध्ये अतिशय छोटी वाटणारी कल्पना फुलवत नेत असत, पण त्यांचा मूळ उद्देश श्रोत्यांना हसवणे हाच होता यात शंका नाही. त्यांनी दोहे स्वरूपात काव्यरचना केली. एका दोह्यात ते म्हणतात, 'कर्जा देता मित्र को वो मूरख कहलाय, महामूर्ख वो यार है जो पैसे लौटाय।' पोलिसांवर व्यंग हा नवीन विषय नाही. मुरादाबादी यांनी त्यांच्या एका दोहय़ात पोलिसांची विनोदी फिरकी घेतली आहे. ते म्हणतात, 'बिना जुर्म के पिटेगा, समझाया था तोय, पंगा लेकर पुलिस से साबित बचा न कोय।' राजकारणावरही ते असेच भाष्य करतात. ते म्हणतात, 'जिंदगी में मिल गया कुर्सियों का प्यार है, अब तो पांच साल तक बहार ही बहार है। कब्र में हैं पांव, पर फिर भी पहलवान हूं, अभी तो मैं जवान हूं।' त्यांनी कवितेला शेरोशायरीच्या परडीत घोळून तिचा सुगंध सतत दरवळत ठेवला. लहान मुलांनाही त्यांची कविता समजत असे इतका सोपेपणा त्यात होता. एचएमव्ही आणि टी-सीरीज कंपनीने त्यांच्या अनेक कॅसेट्सही काढल्या आहेत.
कवितांच्या अशा ओळी जेव्हा त्यांच्या खास पद्धतीने ते उच्चारायचे, तेव्हा त्यांची खुमारी कित्येक पटींनी वाढत असे. त्यात व्यवस्थेतील विसंगतींवर बोट ठेवलेले असे. त्यातील दंभस्फोटामुळे रसिकांना त्या भावत. आपल्या मनातील खदखद कोणीतरी बोलून दाखवीत आहेत, असे रसिकांना वाटल्याशिवाय राहत नसे. त्यांनी आपले सारे आयुष्य जणू काही कवितेलाच समर्पित केले होते. देशभरात आणि जगभरात त्यांच्या कवितावाचनाचे असंख्य कार्यक्रम झाले. यामध्ये हाँगकाँग, बँकॉक, नेपाळ, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, लंडन, मँचेस्टर, अमेरिकेसह अन्य काही देशामध्येही मुरादाबादी यांचा प्रत्यक्ष आवाज पोहोचला.
हुल्लड मुराराबादी यांचे १२ जुलै २०१४रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले.
हुल्लड मुरादाबादी यांनी लिहिलेल्या काही खास काव्यपंक्ती
संपादन१:
महंगाई बढ रही है
मेरे सर पर चढ रही है
चिजों के भाव सुनकर
तबियत बिघड रही है...
२:
जिंदगी में मिल गया कुर्सियो का प्यार है
अब तो पाँच साल तक बहार ही बहार है..
कब्र में हैं पांव, पर फिर भी पहलवान हूं,
अभी तो मैं जवान हूं
३:
जीवन एक सस्पेन्स है, जाने कब क्या होय !
हुल्लड ऐसी फिल्म का एंड न जाने कोय !
४.
सोयी है तक़दीर ही जब पीकर के भांग
महँगाई की मार से टूट गई है टाँग
तुझे फोन अब नहीं करूँगा
पी.सी.ओ. से हांगकांग
मुझसे पहले सी मुहब्बत मेरे महबूब न माँग।
५.
इक चपरासी को साहब ने कुछ ख़ास तरह से फटकारा
औकात न भूलो तुम अपनी यह कह कर चाँटा दे मारा
वह बोला कस्टम वालों की जब रेड पड़ेगी तेरे घर
सब ठाठ पड़ा रह जाएगा जब लाद चलेगा बंजारा
मुरादाबादी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
संपादन- अट्टहास शिखर सन्मान
- कलाश्री पुरस्कार
- काका हाथरसी पुरस्कार
- टी.ओ.वाय.पी. पुरस्कार
- ठिठोली पुरस्कार
- महाकवी निराला सन्मान
- हास्यरत्न पुरस्कार
- भारताचे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या काळात मुरादाबादी यांचा १९९४ मध्ये राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला.
हुल्लड मुरादाबादी यांचे काव्यसंग्रह
संपादन- अच्छा हैं पर कभी कभी
- इतनी ऊँची मत छोडो
- क्या करेगी चाँदनी
- तथाकथित भगवानों के नाम
- त्रिवेणी
- ये अंदर की बात हैं
- हज्जाम की हजामत
- हुल्लड इन हाँगकाँग (कॅसेट)
- हुल्लड की श्रेष्ठ हास्य व्यंग रचनायें
- हुल्लड की हरकतें
- हुल्लड की हुल्लड
- हुल्लड के कहकहे