हुतात्मा बाग (सोलापूर)

(हुतात्मा बाग, सोलापूर या पानावरून पुनर्निर्देशित)

हुतात्मा बाग, सोलापूर हे सोलापूर शहरातील ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ आहे. १९५२-५३ मध्ये ही बाग तयार करण्यात आली होती.[१][२]

जगन्नाथ शिंदे, अब्दूल रसूल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी आणि किसन सारडा, या सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा स्मृतीप्रित्यर्थ ही बाग तयार करण्यात आली असल्याने तिला "हुतात्मा बाग" असे नाव दिले होते.[२]

सोलापूरचे चार हुतात्मे: (डावीकडून) मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन

इतिहास संपादन

ब्रिटिशांच्या काळात सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात एक बाग तयार करण्याची कल्पना त्यावेळचे ब्रिटिश अधिकारी ह्युलेट यांनी मांडली होती. १८८६ सालच्या या कल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. कालांतराने १९४९ मध्ये कामाला सुुरवात झाली. त्यावेळच्या नगरपालिकेने हे काम सुरू केले. "डायरेक्‍टर ऑफ पार्कस ऍन्ड गार्डन्स" या मुंबईच्या संस्थेने बागेचा नकाशा तयार केला.[२]

हुतात्मा बाग म्हणजे पूर्वीचे सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याच्या भवती असलेले खंदक होते याचेच रूपांतर बागेमध्ये करण्यात आली आहे.

ऐतिहासिक महत्त्व संपादन

जगन्नाथ शिंदे, अब्दूल रसूल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी आणि श्रीकिसन सारडा, या सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा स्मृतीप्रित्यर्थ ही बाग तयार करण्यात आली असल्याने तिला "हुतात्मा बाग" असे नाव दिले गेले.

आजच्या काळात संपादन

या बागेत अत्याधुनिक पद्धतीचे दिवे महानगरपालिकेने बसवले आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी आकर्षक खेळणी आहेत, तसेच एक अभ्यासिका देखील आहे. येथे आकर्षक रंगीत कारंजे आणि विविध प्रकारचे फुलझाडे आहेत. चालण्यासाठी लाल मातीचा ट्रॅक बनवला गेला आहे.[३]

संदर्भ संपादन

  1. ^ "Fees for coming to Hutatma Bagh in Solapur; Municipal Commissioner's proposal in the meeting | सोलापुरातील हुतात्मा बागेत येण्यासाठी लागणार शुल्क; मनपा आयुक्तांचा सभेत प्रस्ताव | Lokmat.com". LOKMAT. 2021-02-17. 2022-01-15 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "कालकुपी ः सोलापुरातील हुतात्मा बाग - 01 | Sakal". www.esakal.com. 2022-01-15 रोजी पाहिले.
  3. ^ "हुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम  | Sakal". www.esakal.com. 2022-01-15 रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 50 (सहाय्य)