हिवाळी तरुमती हा एक शिकारी पक्षी आहे. हा मूळचा उत्तर गोलार्धातील ससाणा (फाल्कन) कुळातील पक्षी आहे. त्याच्या अनेक उपप्रजाती उत्तर अमेरिका आणि युरेशियामध्ये पसरल्या आहेत. हा पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून भारतात येतो. म्हणून त्याला हिवाळी तुरुमती म्हणतात. त्यांना इंग्रजीमध्ये Merlin (मर्लिन) म्हणतात.

हिवाळ्यात कच्छच्या रणातील तुरुमती
हिवाळ्यात कच्छच्या रणातील तुरुमतीचा वरचा भाग

हिवाळी तुरुमती २३-३३ सेंमी लांब असतात आणि त्यांच्या पंखांची लांबी ५३-७३ सेंमी असते. माद्या नरापेक्षा मोठ्या असतात. हे पक्षी वेगाने उडतात आणि कुशल शिकारी असतात. ते चिमण्यांपासून लावांच्या आकाराच्या लहान पक्ष्यांची शिकार करतात.