हिवरगांव पावसा हे गांव संगमनेर-पुणे महामार्गालगत आहे.हिवरगांव पावसा हे गांव आद्यनृत्यांगणा लावण्यवती कला सम्राज्ञी नामचंद पवळा यांचे जन्मगाव.स्टेजवर प्रथम नृत्य सादरीकरण करणा-या आद्यनृत्यांगणा लावण्यवती कला सम्राज्ञी नामचंद पवळा यांना जन्मजात प्रतिभासंपन्न सौंदर्य लाभले होते.स्वरूप सुंदर ही देणगी निसर्गाने जन्मजात दिली होती.त्यांनी पान खाल्यानंतर गळा लाल झालेला दिसत असे.प्रतिभासंपन्न सौंदर्यामुले ब्रिटनच्या जॅर्ज मेरीने मुंबई येथे त्याना नामचंद ही पदवी दिली.त्यानंतर ही पदवी कोणालाही मिळाली नाही.त्यांना पहावयास मुंबई येथे स्थेटरला टिकीट काढून गर्दी करत असे. हिवरगाव पावसा येथे आल्यावर टांगा करून त्यांना पहायला येत असे.

  त्यांनी पठ्ठेबापुराव यांच्या बरोबर शाहु महाराजांच्या दरबारात मिठाराणीचे वगनाट्य सादर केले होते.तेव्हा शाहु महाराजानी त्यांना मोत्याची माल बक्षीस दिली होती..
 स्टेजवर प्रथम नृत्य सादरीकरण करणा-या आद्यनृत्यांगणा  कला सम्राज्ञी नामचंद पवळा भालेराव यांचे भाचे  कलाभूषण लहुजी नामदेव भालेराव यांनी त्यांच्या हयातीत तमाशा मध्ये प्रवेश केला.
 कलाभूषण लहुजी नामदेव भालेराव यांनी सुप्रसिद्ध वगनाट्य "सावला कुंभार "यामध्ये सावला कुंभाराची  विनोदी भूमिका साकारली.सन १९३६ मध्ये हिवरगांव पावसा येथील देवगडच्या यात्रेत "सावला कुंभार " हे सुप्रसिद्ध वगनाट्य सर्वप्रथम सादर केले.
  कलाभूषण लहुजी नामदेव भालेराव यांनी सन१९९३ कला सम्राज्ञी पवळा कलामंच या संस्थेची स्थपना केली.संस्थेमार्फत लोककला जतन संवर्धनाचे कार्य केले जात आहे.
 चांगदेव लहुजी भालेराव यांनी महात्मा फुले, डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहु विचारमंच संचलीत बौद्ध कला सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्रास हिवरगांव पावसा येथे सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांची मंजुरी मिलावली आहे.