हिरवे कासव (शास्त्रीय नाव:Chelonia mydas; इंग्लिश:Green Turtle) हा समशीतोष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध व उपोष्ण कटिबंधात आढळणारा उभयचर प्राणी आहे. हे प्राणी जगभरातील उष्णकटिबंधातील किनारे व बेटे येथे घरटी करतात.


  • वर्णन- ह्या कासवांचे वजन साधारणतः 250 कि.ग्रॅ. एवढे असते. पृष्ठत्वर्म (Carapace)चा रंग पाठीमागे संगमरवरी हिरवट असतो व त्यावर गडद रंगाचे ठिपके अगर रेषा असतात.पूर्ण वाढ न झालेल्या कासवाच्या पाठीवर मातकट रंगाच्या रेघोट्या असतात. त्याची लांबी 90 ते 120सें.मी.एवढी असते व आकार अंडाकृती रूंद असतो.अधरत्वर्म (Plastron)चा रंग पिवळसर असतो.डोक्यावर ललाटपूर्व परिरक्षींची एकच जोडी असते.नासिकांपासून सरळ खाली उतरणारे लहान व बसके नाकाड. ह्या कासवाचे पाय वल्ह्यासारखे असतात व पुढील प्रत्येक पायावर एक नख असते.
  • खाद्य- नवजात पिल्ले वयाच्या एक वर्षापर्यंत मांसभक्षी असतात व पुढील संपूर्ण आयुष्य शाकभक्षी असतात. सागरी शैवाल व सागरी गवत इ.खातात.
  • वीणीचा हंगाम- वर्षभर,प्रामुख्याने मे ते सप्टेंबर.मादी वीणीच्या एका हंगामात 4ते 6वेळा 10ते 14 दिवसांच्या फरकाने रात्रीच्या वेळी अंडी घालते.अंड्यांची संख्या 100ते120 एवढी असते.अंडी उबवणीचा काळ साधारणतः 45ते70 दिवस एवढा असतो.
  • सद्यस्थिती- अंड्यांचा अन्न म्हणून उपयोग करणे, अंडी घालण्याच्या जागांचा विनाश व प्रौढ कासवांची मोठ्या प्रमाणात होणारी हत्या यामुळे ही जात संकटात आहे.भारतीय वन्य जीव (संरक्षण) कायदा 1972 मधील अनुसूची-1 अन्वये संरक्षित