हियन कालावधी (平安 時代 हेयान जिदाई) ह सन ७९४ ते ११८५ च्या दरम्यानचा हा काळ आहे. हा जपानी पारंपारिक इतिहासाचा शेवटचा विभाग मानला जातो.[१] या कालावधीचे नाव हियन-क्यो, किंवा आधुनिक क्योटोच्या नावावरून ठेवले गेले. जपानी इतिहासातील हा काळ आहे जेव्हा जपानी संस्कृतीत बौद्ध, ताओ धर्म आणि अन्य चिनी प्रभाव त्यांच्या उच्चतम स्तरावर होता. हियन कालावधी जपानी शाही दरबाराचा शिखर देखील मानला जातो आणि तो त्याच्या कलेसाठी, विशेषतः कविता आणि साहित्य यासाठी प्रसिद्ध होता. जपानच्या इम्पीरियल हाऊसच्या हातात जरी सत्ता दिसत असली तरी खरी सत्ता फुजीवारा वंशाच्या ताब्यात होती. फुजीवारा वंश शाही घराण्याचे व्याही होते. बऱ्याच सम्राटांची आई फुजीवाडा कुटुंबातील होती.[२] हियान (平安) शब्दाचा अर्थ जपानी भाषेत “शांती” असा आहे.

हियन कालावधीची लहान प्रतिकृती

इतिहास संपादन

हियन कालावधी नर काळाच्या आधीचा होता. याची सुरुवात सन ७९४ पासून झाली. याच काळात जपानची राजधानी जपानच्या ५०व्या सम्राट कन्मु याने हियान-क्यो (सध्याची क्योटो) येते हलवली.[३] कन्मुने प्रथम राजधानी नागाओका-कि येथे हलविण्याचा प्रयत्न केला, परंतु या शहरावर आलेल्या अनेक आपत्तींमुळे सम्राटाला राजधानी दुसऱ्या ठिकाणी हलवायला लागली. ९ व्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत चीनमध्ये एक बंडखोरी झाली, ज्यामुळे राजकीय परिस्थिती अस्थिर बनली होती. यामुळे तांग चीनमधील जपानी मोहिम निलंबित केले गेली. तसेच चीनी निर्यातीचा ओघ थांबला, यामुळे कोकोफु बन्का ( 国 風 文化 ) या जपानी संस्कृतीचा विस्तार झाला. म्हणून, जपानच्या संस्कृतीत हियन कालावधी हा उच्च बिंदू मानला जातो आणि नंतरच्या पिढ्यांनी नेहमीच या गोष्टीचे कौतुक केले आहे. याच काळात समुराई वर्गाचा उदय झाला. नंतर समुराई वर्गाने सत्ता काबीज केली आणि जपानमध्ये सामंत कालावधी सुरू झाला.

मुख्य म्हणजे, सार्वभौमत्व सम्राटाकडे होते परंतु प्रत्यक्षात फुजीवाडा खानदानाने सत्ता हातात घेतली होती. तथापि, प्रांतामधील त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, फुजिवारा आणि इतर मोठ्या कुटुंबांना रक्षक, पोलीस आणि सैनिक याची गरज होती. यामुळे लढाऊ वर्गाला संपूर्ण हियन कालावधीत सतत राजकीय वरदहस्त मिळाला.[२] इ.स. ९३९ च्या सुरुवातीच्या काळात, तैरानो मासाकोडोने पूर्वेकडील हिताची प्रांतात उठाव निर्माण करून केंद्र सरकारच्या अधिकारास आव्हान दिले. जवळजवळ याच वेळी, फुजिवारानो सुमीटोमोने पश्चिमेस बंड केले. तरीही, जपानी सरकारची उचलबांगडी होण्यास बरीच शतके लागली. आणि ते होण्यासाठी शोगुनच्या खासगी सैन्याचा कालावधी कारणीभूत ठरला.

होगन बंडामुळे कोर्टावर योद्धा वर्गाचा प्रभाव होण्यास सुरुवात झाली. यावेळी तायरानो किओमोरीने आपल्या नातवाला सिंहासनावर बसवून त्याच्या अधिकाराद्वारे जपानवर राज्य करून फुजीवाराच्या कुटुंबाचे पुनरुज्जीवन केले. त्यांचे कुळ, तायरा, लयाला जाण्यासाठी जेनपी युद्ध कारणीभूत ठरले. याचे युद्धाने कामाकुरा शोगुनेटची सुरुवात केली. कामकुराचा काळ ११८५ मध्ये सुरू झाला जेव्हा मिनामोटोनो यॉरिटोमोने सम्राटांकडून सत्ता हस्तगत केली आणि कामकुरामध्ये शोगुनेटची स्थापना केली.[४]

संदर्भ संपादन

  1. ^ Encyclopædia Britannica.
  2. ^ a b Seal.
  3. ^ Shively and McCullough 1999.
  4. ^ Ancient Japan.

ग्रंथसूची संपादन