हिंगलजा देवी
हिंगलजा माता (उर्दू: ہنگلاج ماتا), हिंगलजा देवी, हिंगुला देवी किंवा नानी मंदिर हे पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतातील एक हिंदू मंदिर आहे.
देवीच्या शक्तिपीठांपैकी एक हिंग्लजा मातेचे मंदिर बलुचिस्तानात आहे (त्या देवीची स्थानिक मुस्लिम आणि राजस्थानादी प्रांतात भरपूर भक्तगण आहेत)[ चित्र हवे ]. कदाचित अफगाणिस्तानातही एखादे मंदिर राहिले असावे.[१][ दुजोरा हवा] बलुचिस्तानमधील देवी गावाचे स्थलनाम हिंग्लज असेच आहे आणि तेथील नदीचे नाव हिंगोल आहे. हिंग्लजगड नावाने एक शक्तिपीठ माळव्यात मध्यप्रदेशात असावे.[ दुजोरा हवा] उत्तरप्रदेशात हिंगौरी नावाचे गाव हिंगलजा देवी शी संबंधित आहे.[ दुजोरा हवा].
बिकानेर-जोधपूर रेल्वेमार्गावर बिकानेरपासून वीस मैल दक्षिणेस देशनोक नावाच्या गावात करणी मातेचे मंदिर आहे. मंदिरात हे मंदिर करणीमातेचे असून मूळस्थान हिंगलाज देवी बलुचिस्तानात असल्याचा उल्लेख आहे.[२]
महाराष्ट्रातील स्थलनामे
संपादनमहाराष्ट्रात हिंगलाज देवीशी जुळणारी गडहिंगलज, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात हिंग्लजवाडी नावाचे गाव, शिवाय हिंगण/णा/णी अशी स्थलनामे ही महाराष्ट्रात दिसतात
संदर्भ
संपादन- ^ गूगल बुक्स
- ^ हिंगलाज देवीचे मूळ ~ले. सुकन्या आगाशे लोकसत्ता रविवार दिनांक ८ ऑगस्ट २००४ Archived 2004-12-14 at the Wayback Machine. लेख दिनांक ३ ऑगस्ट २०१५ रोजी भाप्रवे रात्रौ २२.२० मिनिटांनी जसा पाहिला