हाइक मेसेंजर ही महाजालावर स्मार्टफोनवर चालणारी झटपट संदेश सेवा देणारी एक भारतीय सोशल मिडिया नेट्वर्किंग कंपनी आहे. यामद्धे मजकूर संदेशांव्यतिरिक्त, त्याचे वापरकर्ते ऑडिओ, प्रतिमा, फाइल, आवाज संदेश, व्हिडिओ आणि एकमेकांना ठिकाण पाठवू शकतात. २०१६ च्या आकडेवारीनुसार १०० मिलियन पेक्षा जास्त लोक हाइक मेसेंजरचा वापर करतात.[] भारती इंटरप्राइजेस आणि सॉफ्टबॅँक कॉर्पोरेशनतर्फे ‘हाईक’ ही मेसेंजर सेवा सुरू केली गेली होती, भारती इंटरप्राइजेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांचे पुत्र कविन भारती मित्तल हे या कंपनीचे संस्थापक आहेत. हाइक मेसेंजर ही सेवा जगातील २००हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे.[]

हाइक डायरेक्ट

संपादन

हाइक डायरेक्ट या सुविधेद्वारे महाजालाशी संपर्क नसताना देखील संदेश पाठविता येतो. याचा वापर करून एखादी व्यक्ती वायफाय अथवा मोबाईल डाटा सुरू नसताना देखील मेसेज पाठवता येऊ शकतो.[ संदर्भ हवा ] यात फोटोज, स्टिकर्स, फाईल्सही पाठवल्या जाऊ शकतात. यामद्धे ७० एमबीपर्यंतच्या फाईल्स केवळ १० सेकंदात पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

मोफत दूरध्वनी सुविधा

संपादन

मोफत फोनची सुविधा ‘हाईक’ मेसेंजर चॅटिंग ॲप्लिकेशन तर्फे २०१५ मद्धे सुरू करण्यात आली टू जी, थ्री जी आणि वायफाय सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना यासेवेचा वापर करता येतो, ‘झिप’ फोन ही कंपनी हाईक कंपनीने विकत घेतल्यानंतर काही महिन्यात हाइक मेसेंजरने मोफत फोन देण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली. या सुविधेनंतर हाईक, व्हॉट्सॲप, लाईन, स्काइप या कंपन्यांवर नियंत्रण आणले जावे अशी मागणी अनेक मोबाईल कंपन्यांकडून केली गेली.

हाईक स्टिकर्स

संपादन

हाईक स्टिकर्स हे हाईकचे सर्वात लोकप्रिय फिचर आहे, देशातील वेगवेगळ्या भाषांत हे स्टिकर्स यात उपलब्ध असुन. दररोजच्या चर्चेतील जवळपास सर्वच विषयांचे स्टिकर्स हाईक वर उपलब्ध असुन ते युझरला हवे तसे डाऊनलोड करता येतात. बॉलीवूड, मराठी चित्रपटातील खास संवाद, मुलीमुलींच्या गप्पा, नेहमी वापरले जाणारे शब्द, परीक्षेचा कालावधी, शहरांच्या विशेष जागा, मराठी सीरीयल्स मधील प्रसिद्ध संवाद, प्रसिद्ध गाणी, क्रिकेट, कार्टून्स अश्या अनेक विषयांवरील स्टिकर्स येथे पाहायला मिळतात. तसेच सणाच्या शुभेच्छा देखील हाईक स्टिकर्सद्वारे उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्ट लिहून व्यक्त करण्यापेक्षा हाईक स्टिकर्स वापरून भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात त्यामुळे लिहिण्याचा वेळ देखील वाचतो.[]

समूह संवाद

संपादन

एकाच वेळी १००० सदस्यांसोबत समूह संवाद साधण्याची सुविधा यामद्धे उपलब्ध आहे, मोठे व्हिडिओज, कॉम्प्रेस न केलेल्या मूळ प्रतिमा, कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज सामायिक करता येतात.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "100 mn-user mark crossed by hike messenger - The Financial Express". www.financialexpress.com. 2018-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Hike Blog". Hike Blog. 2018-11-02 रोजी पाहिले.
  3. ^ "स्टिकर बोले, चॅट चाले। - Dainik Prabhat | DailyHunt". DailyHunt (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.