हसीना मोइन या उर्दू नाट्यलेखिका आणि कथालेखिका आहेत. त्यांनी पाकिस्तानमध्ये निर्मित पहिली दूरचित्रवाणीमालिका कथा लिहिली. किरन कहानी नावाची ही मालिका १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस प्रसारित झाली होती. त्यांना अनकही, तनहाईयाँ आणि धूप किनारे यांसह अनेक नाटके लिहिली आहेत. त्यांना पाकिस्तानातील तमगा-ए-हुस्न-ए-कार्करदागी हा पुरस्कार मिळाला आहे.

त्यांचा जन्म ब्रिटिश भारतात कानपूरमध्ये झाला. भारताच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब कराची येथे स्थलांतरित झाले.