महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील १५ शहरामधील ४५ स्टेशनवरून हवेच्या गुणवत्तेची देखरेख करणारे केंद्र MPCB चालवते . ज्या संस्था परस्पर SPCBला अहवाल देतात अशा स्वतंत्र संस्था राष्ट्रीय हवा देखरेख कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कार्य केले जाते .नुकतेच असे आढळून आले कि अशा केंद्राकडून हवेच्या गुनाव्तेबाबाद्तची माहिती MPCB तयार स्वरूपात उपलब्ध होत नाही .राज्यातील महत्त्वाची शहरे, औद्योगिक क्षेत्रे आणि संवेदनशील क्षेत्रे या बाबतची माहिती जमविण्यासाठी एम पी सी बीला ए ए क्यु एम स्टेशन्सची आवश्यकता आहे. संपूर्ण महाराष्टाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सध्याचे ए ए क्यु एमच्या ४५ स्टेशन्सचे नेटवर्क हे पुरेसे नाही.या सर्व विविध गोष्टींचा विचार करून, हवेची गुणवत्ता वाढीचे संपूर्ण नेटवर्क मध्ये वाढ व्हावी यासाठी, आम्ही सी पी सी बीला असे प्रस्तावित केले आहे की सध्या मान्यताप्राप्त असलेली एन ए एम पीची सर्व स्टेशन्सचे व्यस्थापन एम पी सी बी ने करावे. या वाढीच्या आणि मजबुतीकरणाच्या प्रक्रीयेमध्ये एन ए एम पीच्या अखत्यारीत असलेल्या शहरांमध्ये काही नवीन स्टेशन्स वाढविली जातील आणि काही नवीन शहरांचा / औद्योगिक क्षेत्रे देखरेखी खाली आणली जातील.

हवेची गुणवत्ता व सार्वजनिक आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध आहे.