हळदी कुंकू (पक्षी)

आकाराने बदकाएवढा असतो परंतु चणीने मोठा


हळदी कुंकू किंवा घनवर (इंग्रजीत, स्पॉटबिल डक, शास्त्रीय नाव - Anas poecilorhyncha) हे भारतात सर्वाधिक आढळणारे बदक असून याला भारतातले स्थानिक बदक मानण्यात येते. इतर बदकांप्रमाणे हे लांबवर स्थलांतर करत नाही. जर हवापाणी व अन्न व्यवस्थित मिळाले तर आयुष्यभर एकाच पाणथळ जागेत राहते.

हळद कुंकू बदक

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
जातकुळी: ॲनस
जीव: अ‍ॅ. पोसिलोर्हयन्का
शास्त्रीय नाव
ॲनस पोसिलोर्हयन्का
हळदकुंकू पक्ष्याचा आढळ प्रदेश
हळदकुंकू पक्ष्याचा आढळ प्रदेश

पिसांवर खवल्या-खवल्यांसारखी पिवळट व गडद उदी रंगाची चिन्हे असतात. पंखाची बाजू पांढऱ्या व तकतकीत हिरव्या रंगाच्या दुरंगी पट्ट्याने उठून दिसते. पाय नारिंगी-तांबडे असतात. काळ्या चोचीचे टोक पिवळे असून चोचीच्या बुडाशी कपाळाच्या दोन्ही बाजूंना दोन पिवळे-नारिंगी रंगाचे ठिपके उठून दिसतात. या बदकांना त्यांच्या चोचीवरील मोठ्या पिवळ्या ठिपक्यानेच ओळखता येते. तसेच हे बदक जंगली बदकांमध्ये सर्वाधिक मोठे असून कदाचित त्यामुळेच ते स्थलांतर करत नसावे.

महाराष्ट्रातील बहुतेक पाणथळ जागांमध्ये यांचे अस्तित्त्व आढळून येते. कर्नाटकात आणि काश्मीरमध्येही ते आढळते. जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात घनवर पक्ष्यांची वीण होते. तळी, नद्या आणि सरोवरे ही त्यांची निवासस्थाने आहेत. विदर्भातल्या पैनगंगा अभयारण्यात ही बदके मोठ्या प्रमाणात दिसतात.

स्पॉटबिल बदक
  1. ^ BirdLife International (2016). "Anas poecilorhyncha". IUCN Red List of Threatened Species. 2016. 25 July 2017 रोजी पाहिले.