हरमायनी ग्रेंजर

(हर्मायोनी ग्रेंजर या पानावरून पुनर्निर्देशित)


हरमायनी जीन ग्रेंजर ही लेखिका जे.के. रोलिंग यांच्याच्या हॅरी पॉटर या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे . हरमायनी ही तिच्या मगल जन्मातली , म्हणजेच जिचे पालक जादूगार नाहीत अशी जादुगारीण आहे. तिचा जन्म १९ सप्टेंबर १९७९ रोजी झाला.

हरमायनी जीन ग्रेंजर


एमा वॉटसन हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ फीनिक्स चित्रपटामध्ये हरमायनी ग्रेंजरच्या पात्रात.

पात्राचे नाव हरमायनी जीन ग्रेंजर
अभिनेत्री एमा वॉटसन
प्रजाती मगल
विभाग ग्रिफिंडोर
पहिला प्रवेश हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन

अल्प चरित्र संपादन करा

हरमायनी ग्रेंजर तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती. हरमायनी हॉगवॉर्ट्‌ज मध्ये ग्रिफिंडोर विभागातील एक मगल विद्यार्थिनी आहे. ती हॅरी पॉटर आणि रॉन विजली यांची सर्वात चांगली मैत्रीण आहे.[१] व ती अभ्यासू आणि हुशारही होती.

हर्मायोनीचे पालक दंतवैद्य होते व हरमायनीच्या विचित्र वागण्याचा त्यांना नेहमी विचार पडत असे. तरीपण त्यांना तिचा खूप अभिमान होता[१]. जेव्हा हरमायनी अकरा वर्षांची झाली, तेव्हा तिला कळते की ती एक जादुगारीण आहे, व तिला हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री या जादुगिरी शिकविणाऱ्या शाळेकडून, जादू शिकण्यासाठी निमंत्रणपत्रिका येते. हर्मायनीनी ते निमंत्रण उत्सुकतेखातर स्वीकारते, व शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच ती जादू शिकण्यास सुरुवात करते. तिला काही सुरुवातीचे मंत्र म्हणण्यात यश सुद्धा येते.

हरमायनीचे हॉगवॉर्ट्‌ज मधील शिक्षणाची अधिकृतरीत्या सुरुवात १ सप्टेंबर १९९१ रोजी होते. हरमायनी फार हुशार व अभ्यासू विद्यार्थिनी असते. तिची हॅरी पॉटररॉन विजली यांच्याशी ओळख शाळेत दाखल होण्यासाठी हॉगवॉर्ट्झ एक्सप्रेस मधून, हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्रीकडे प्रवास करतांना होते. ती नेहमी तिच्या हुशारीचे प्रदर्शन करीत असे. त्यामुळे इतरांना तिचा नेहमी राग येत असे. लेव्हिटेशन चर्म हा जादूचा मंत्र म्हणण्यात रॉन एकदा चूक करतो म्हणून ती सर्वांसमोर त्याचा अपमान करते. म्हणून सुरुवातीला हॅरी आणि रॉन यांना ती फार उद्धट आणि अभिमानी वाटते. एकदा ते दोघे मिळून तिला एका ट्रोल नावाच्या राक्षसापासून वाचवतात. त्यांच्या या मदतीसाठी आभार प्रकट करण्यासाठी ती त्यांच्या शिक्षकांशी खोटे बोलून, या घटनेचा सर्व दोष स्वतःवर ओढून घेते व हॅरी आणि रॉनला शिक्षेतून वाचवते. तिच्या या सहकार्यामुळे हॅरी आणि रॉन तिचे चांगले मित्र बनतात.

शाळेच्या दुसऱ्या वर्षी हरमायनी बेसिलिस्क नावाच्या सापाची बळी होते. हा साप चेंबर ऑफ सीक्रेट्स नावाचीया गुप्त खोली उघडली गेल्यामुळे आख्ख्या हॉग्वार्ट्झला दहशतीत ठेवत असतो. बेसिलिस्क हरमायनीचे केवळ नजरेने पाषाणात रूपांतर करतो. पण नंतर तिची या जादुगिरीपासूसुन सुटका होते व ती पूर्णपणे बरी होते.

शाळेच्या तिसऱ्या वर्षी हरमायनीला टाईम टर्नर नावाचे यंत्र वापरण्याची परवानगी मिळते. त्या यंत्राच्या वापराने तिला इतर विद्यार्थ्यांपेक्षा शाळेतील जास्त वर्गात हजर राहून, जास्त अभ्यास करता येतो. नंतर ती व हॅरी त्याच यंत्राचा उपयोग करून सिरियस ब्लॅकला त्याच्या डिमेन्टोर्स किस नावाच्या शिक्षेतून व ब्कबीक नावाच्या हिप्पोग्रिफ प्रजातीच्या प्राण्याला त्याच्या मरणाच्या शिक्षेतून वाचवतात.

शाळेच्या चौथ्या वर्षी हरमायनी "एस. पी. ई. डब्ल्यू" नावाची संस्था काढते. या संस्थेच्या वतीने ती हाऊस एल्वस प्रजातीच्या प्राण्यांवर होणाऱ्या तिरस्करणीय वागणुकीचा निषेध करते व त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आंदोलन करते.

शाळेच्या पाचव्या वर्षी डंबलडोरला त्याची सेना स्थापन करण्याच्या कामात हरमायनीचा खूप मोठा हातभार लागतो. ती बॅटल ऑफ डिपार्टमेंट ऑफ मिस्ट्रीज या युद्धातसुद्धा चांगलेच कौशल्य दाखवते.

शाळेच्या सहाव्या वर्षी हरमायनी बॅटल ऑफ द ॲस्ट्रॉनॉमी टॉवरबॅटल ओव्हर लिटिल व्हिंगिंग या दोघा युद्धांमध्ये सहभागी होते. हॅरी स्वतःहून लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे हॉरुक्स शोधण्यासाठी निघाला असतो व त्याला या शोधात मदत करण्यास ते दोघेपण त्याच्या सोबत निघतात. त्यासाठे हरमायनी व रॉन विजली हे दोघे सातव्या वर्षी शाळा सोडण्याचा निर्णय घेतात. नंतर हरमायनी व रॉन बॅटल ऑफ हॉगवॉर्ट्‌ज या युद्धात सहभागी होतात.

दुसऱ्या विझार्ड्रिंग वॉर या युद्धानंतर, हरमायनीला मिनिस्ट्री ऑफ मॅजिक या संस्थेत नोकरी मिळते. या संधीचा फायदा घेऊन, ती तिच्या हाऊस एल्वस या प्राण्यांच्या दयनीय स्थितीत सुधारणा होण्यासाठी छेडलेल्या आंदोलनाचा प्रचार करते.

पुढे तिला बढती मिळून ती डिपार्टमेंट ऑफ मॅजिकल लॉ एन्फोर्समेंट या विभागात जाते. ती रॉन विजलीशी लग्न करते व त्यांना दोन मुले होतात. तिच्या मुलाचे नाव ती ह्यूगो आणि मुलीचे रोझ ठेवते.

शेवटी हरमायनी ही हॅरी पॉटर आणि जिनी विजलीचा मुलगा असलेल्या जेम्स सिरियस पॉटरची धर्ममाता होते.


हॉगवॉर्ट्‌ज शाळेतील दिवस संपादन करा

हरमायनीने हॉगवॉर्ट्‌ज मधील विद्यार्थिनी असताना खूप मजा केली. ती तिच्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायची. ती शाळेचे नियमसुद्धा गंभीरपणे पाळायची. सुरुवातीला तिला चर्मस नावाचा विषय सर्वात जास्त आवडता होता, नंतर तिला अरिमॅन्सी नावाचा विषय आवडायला लागला. फ्लायिंग आणि डिव्हिनेशन हे दोन विषय तिला फार अवघड जायचे. टेरी बूट सारखे हॉगवॉर्ट्‌जचे काही विद्यार्थी नेहमी विचार कर की हरमायनीची निवड ग्रिफिंडोर विभागात का व्हावी? त्यांना वाटत असे की खरे तर हरमायनीची निवड रॅव्हवनक्लॉ या विभागात व्हायला पाहिजे होती, कारण त्यासाठी ती पुरेशी हुशार व चतुर होती. हॉगवॉर्ट्‌जला पहिल्या दिवशी, जेव्हा सॉर्टिंग हॅट नावाची टोपी विद्यार्थ्यांना त्यांचे त्यांचे विभागांमध्ये वाटत होती, तेव्हा ती टोपी हरमायनीला रॅव्हननक्लॉ विभागात टाकण्याच्या बेतात होती. पण हरमायनीने मनात धरलेल्या इच्छेनुसार त्या टोपीने हरमायनीला ग्रिफिंडोर विभागातच टाकले. ती आधीपासूनच "हॉगवॉर्ट्‌ज मधील सर्व विभागांमध्ये, ग्रिफिंडोर विभाग सर्वात चांगला आहे असे ट्रेनमध्ये सर्वांना सांगत होती. .". हॅरी पॉटरने सुद्धा आधीचा स्लिधरिन सोडून ग्रिफिंडोर विभाग निवडला होता.

हरमायनीने नंतर तिच्या हुशारीने व हिंमतीने हॉगवॉर्ट्‌ज व डंबलडोर सेना यांच्या प्रति असलेल्या तिच्या निष्ठेने सिद्ध् केले की ग्रिफिंडोर विभागासाठीच झालेली तिची निवड योग्य होती. ग्रिफिंडोर विभागात निवड झाल्यामुळे हरमायनीच्या खोलीत लॅव्हेंडर ब्राऊन, पार्वती पाटील आणि इतर दोन मुली रहायच्या.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.दुसरे वर्ष संपादन करा

हर्मायोनीला हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सीक्रेट्स या भागात तिचे नविन शिक्षक, गिल्ड्रोय लॉकहार्ट यांच्या बद्धल प्रेम निर्माण होते. गिल्ड्रोय हे या भागात हॉग्वार्ट्झ मध्ये हर्मायोनीच्या वर्गात काळ्या जादुपासून आत्मरक्षा हा विषय शिक्वण्यास भरती होतात. पुढे या भागात ग्रिफिंडोर आणि स्लिधरिन या दोघा विभागांमध्ये क्विडिच स्पर्धेचा खेळ चालू असतो. त्या वेळेस ड्रेको मॅल्फ़ोय हर्मायोनीला मडब्लड या नावाने तिची टीका करतो. ड्रेको आणि हर्मायोनी मध्ये जोरदार भांडण होता होता राहते. मडब्लडहा शब्द मगल जन्माच्या जादुगरांसाठी खूप मोठा अपमान मानला जातो.

कथानकातील इतर कारकीर्द संपादन करा

हॉरुक्सचा शोध संपादन करा

शारीरिक वर्णन संपादन करा

व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिचरित्राचे लक्षण संपादन करा

जादुई सामर्थ्य आणि कौशल्य संपादन करा

जादुई मालमत्ता संपादन करा

कथानकातील पात्रांसोबतचे संबंध संपादन करा

लेखीकेची टिप्पणी संपादन करा

जे.के. रोलिंग हरमायनीचे वर्णन करताना म्हणतात की हरमायनी ही एक प्रामाणिक, तर्कशुद्ध विचाराची व चांगल्या चारित्र्याची मुलगी आहे[२]. रोलिंगने लुना लवगूड नावाच्या पात्राचे विचार हरमायनी विरोधी असल्याचे वर्णन केले आहे[३], व दोघींची विचारधारा एकदम विपरीत असल्याचेही वेगळे वर्णन केले आहे. रोलिंगच्या शालेय कारकिर्दीत काही मुली त्यांच्या बरोबर नेहमी गुंडगिरी करत असत, त्या मुलींवर आधारीत, रोलिंगने पॅन्सी पार्किन्सन नावाची होगवर्ट्‌जमधील पात्र बनवले. हे पात्रसुद्धा हरमायनी बरोबर नेहमी गुंडगिरी करत असे. लुना लवगूड आणि पॅन्सी पार्किन्सन या दोघी मुलींची पात्रे रोलिंगच्या जीवनातील खऱ्या मुलींवर आधारित आहेत.[४]

संदर्भ संपादन करा