डॉ. हरिश्चंद्र थोरात (जन्म २६ एप्रिल १९५२) हे मराठीतील ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक, व विचारवंत आहेत. साहित्याचे समाजशास्त्र, आधुनिक साहित्यसिद्धान्त, संस्कृति-अभ्यास इ. अभ्यासविषयांसंदर्भात त्यांनी लेखन केले आहे. कादंबरीचे आणि कथानात्म साहित्याचे अभ्यासक म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत.

डॉ. हरिश्चंद्र थोरात
जन्म २६ एप्रिल १९५२
कार्यक्षेत्र मराठी साहित्य, समीक्षा
भाषा मराठी
विषय साहित्याचे समाजशास्त्र, आधुनिक साहित्यसिद्धान्त, संस्कृति-अभ्यास, कथनात्म साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती साहित्याचे संदर्भ, कादंबरी : एक साहित्यप्रकार, मूल्यभानाची सामग्री

शिक्षण आणि अध्यापन संपादन

थोरात ह्यांनी मुंबई विद्यापीठाची एम. ए. संपादित केली. तसेच कादंबरी : एक साहित्यप्रकार ह्या विषयावर त्यांनी प्रबंध सादर करून पीएच. डी. ही पदवी मिळवली.

थोरात ह्यांनी कीर्ती महाविद्यालय, दादर येथे १८ वर्षे मराठी ह्या विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर ६ वर्षे मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी ह्या विषयाचे अध्यापन केले. मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक साहित्याभ्यास अध्यासनाचे विभागप्रमुख प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले.

डॉ. थोरात हे मुक्त शब्द ह्या मासिकाचे संपादकीय सल्लागार आहेत.

प्रकाशित साहित्य संपादन

  1. साहित्याचे संदर्भ, मौज प्रकाशन आणि मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई, (२००५)
  2. कादंबरीविषयी, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, (२००६)
  3. कादंबरी : एक साहित्यप्रकार, शब्द पब्लिकेशन, मुंबई, (२०१०)
  4. हे ईश्वरराव...हे पुरुषोत्तमराव...बद्दल,पद्मगंधा प्रकाशन, पुणे, (२०११)
  5. कथनात्म साहित्य आणि समीक्षा, शब्द पब्लिकेशन, मुंबई, (२०११)
  6. मूल्यभानाची सामग्री, शब्द पब्लिकेशन, मुंबई, (२०१६)

सन्मान आणि पुरस्कार संपादन

  • २०१७मध्ये सातारा येथे झालेल्या चौथ्या समीक्षा-संमेलनाचे अध्यक्ष