हनुमंत उपरे
हनुमंत बाबुराव उपरे (जन्म : २ जुलै १९५२; - १९ मार्च २०१५) हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष, व 'ओबीसी बौद्ध-धर्मांतरा'चे प्रणेते होते.[१]
हनुमंत उपरे | |
---|---|
टोपणनाव: | काका |
जन्म: | २ जुलै १९५२ बीड,महाराष्ट्र |
मृत्यू: | १९ मार्च इ.स. २०१५ मुंबई |
चळवळ: | ओबीसी बौद्ध-धर्मांतर चळवळ |
शिक्षण: | M.sc Zoology (Helminthology) |
संघटना: | [सत्यशोधक ओबीसी परिषद] |
अवगत भाषा: | मराठी,हिंदी,इंग्लिश |
कार्यक्षेत्र: | प्राध्यापक,उदयोजक,सामाजिक-धार्मिक कार्यकर्ता, राजकारणी |
पत्रकारिता/ लेखन: | भारतातील हिन्दुस्तान,ओबीसी जात सोडतो तेव्हा..!,मी ओबीसी बोलतोय,मराठी आरक्षण भ्रम की वास्तव,ओबीसीला पर्याय धर्मांतर,नचिपन कामीशन (?),भावसार जागृती (मासिक) |
पुरस्कार: | १)धम्म रत्न पुरस्कार (बुद्ध विहार समिति)
२)कर्मवीर दादासाहेब गायकवाड़ सन्मान चिन्ह ३)समता पुरस्कार, औरंगाबाद ४)वृत्तरत्न दैनिक सम्राट २०१२ “सम्राट पुरस्कार” ५)साहित्य रत्न पुरस्कार, सह्याद्रि गुणगौरव फाउंडेशन, कोल्हापूर ६)विश्वरत्न अनमोल पुरस्कार-२०१०,विश्व वारकरी सेना, पंढरपूर ७) घटनाकार-प्रबोधनकार विचार पुरस्कार-२०१४
|
प्रमुख स्मारके: | स्मृतिशेष धम्मरत्न हनुमंत उपरे स्मृतिस्थळ, घोसपुरी, ता.जि.बीड |
धर्म: | बौद्ध धर्म |
प्रभाव: | तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, शाहू महाराज |
प्रभावित: | ओबीसी समाज |
वडील: | बाबूराव उपरे |
आई: | पार्वतीबाई |
पत्नी: | श्रीमती कमलबाई उपरे |
अपत्ये: | २ मुलगे - संतोष, संदीप व २ मुली |
जीवन
संपादनहनुमंत उपरे यांचा बीड जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म झाला.[ संदर्भ हवा ] उपरे यांनी कष्टाने उच्च शिक्षण घेतले. इ.स. १९९०-९५ दरम्यान प्राध्यपकाची नोकरी करीत असतानाच त्यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत प्रवेश केला. भारिप बहुजन महासंघाचे ते काही काळ प्रदेशाध्यक्ष होते. उपरे यांचा पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव द्यावे यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र प्रवास केला होता. भावसार जागृती नावाचे मासिक त्यांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ चालवले. त्यातून त्यांनी ओबीसीतील अनेक उपेक्षित जातींबद्दल लिहिले. मी ओबीसी बोलतोय हे पुस्तक त्यांनी लिहिले.[ संदर्भ हवा ]
धर्मांतर चळवळ
संपादनपुढे उपरेंनी सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या माध्यमातून ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. उपरे यांनी २००६ मध्ये नवयान बौद्ध धम्म स्वीकारला आणि २००७ मध्ये, मुंबई लक्षावधी लोकांना मुख्यतः ओबीसी व आदिवासी, बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[२] ओबीसी समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आर्थिक, सामाजिक लढ्याबरोबरच सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ केली पाहिजे, अशी त्यांची धारणा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला प्रेरणास्थानी ठेवून त्यांनी १४ ऑक्टोबर २०११ पासून ‘चलो बुद्ध की ओर’ - ‘ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर’ हे अभियान सुरू केले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसी धर्मांतर जनजागृती परिषदा घेतल्या. राज्यातील लाखो ओबीसींना आपल्या मूळ (?) बौद्ध धम्माकडे आणण्याची चळवळ त्यांनी हाती घेतली होती. त्यांच्या या चळवळीला राज्यभरातून नव्हे तर इतर राज्यातूनही मोठा प्रतिसाद मिळाला होता.[ संदर्भ हवा ] त्याचा परिणाम म्हणून ओबीसीमधील विविध जातींमधील सुमारे साडे सहा हजार लोकांनी धर्मातर केले होते. याच्या पुढील वर्षी १४ ऑक्टोबर २०१६ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर ५ लाख ओबीसी धर्मांतर करून बुद्ध धम्माचा स्वीकार करतील असे त्यांनी उद्दिष्ट ठेवले होते. हनुमंत उपरेंच्या पश्चात ही धर्मांराची चळवळ त्यांचे पुत्र संदीप उपरे पुढे चालवीत आहेत.[ संदर्भ हवा ]
निधन
संपादनहनुमंत उपरे यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी १९ मार्च २०१५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास मुंबईत निधन झाले.[३] उपरे यांना ८ मार्च रोजी औरंगाबाद येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये मेंदूत रक्तस्राव झाल्याने दाखल करण्यात आले होते. त्यांनंतर त्यांना ११ मार्च रोजी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र १९ मार्च गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. उपरे यांच्या इच्छेनुसार त्यांचे डोळे, किडनी यासारख्या अवयवांचे दान केले गेले आहे.[४]
संदर्भ
संपादन- ^ https://www.loksatta.com/mumbai-news/satyashodhak-obc-parishad-activist-hanumant-upre-passes-away-1083211/
- ^ "Around 6,000 OBCs in Maharashtra to embrace Buddhism on New Year". India Today (इंग्रजी भाषेत). 2018-04-04 रोजी पाहिले.
- ^ https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/hanumant-upre/articleshow/46628049.cms
- ^ https://www.loksatta.com/mumbai-news/satyashodhak-obc-parishad-activist-hanumant-upre-passes-away-1083211/