स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस

पावस हे गाव मोहक नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आणि रत्‍नागिरीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या सुंदर मंदिराच्या परिसरात, ध्यानगुंफा (चिंतन कक्ष) आणि एमिलियाचे झाड आहे. स्वामींचे घर असलेले "अनंत निवास" हे मंदिर ट्रस्टने उत्तम राखले आहे. मंदिर विश्वस्त, स्वामींचे जन्मदिवस, गुरुपौर्णिमा इत्यादी अनेक उत्सव साजरे करतात. केवळ रत्‍नागिरीतीलच नव्हे तर भारतातील सर्व भागातील अनेक अनुयायी स्वामींच्या शिकवणींवर विश्वास ठेवतात.

स्वामी स्वरूपानंद

संपादन

स्वामी स्वरूपानंद ऊर्फ रामचंद्र विष्णू गोडबोले यांच्या दीर्घ निवासामुळे हे गाव रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण मानले जाते. स्वामी स्वरूपानंद वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते.

लौकिक जीवन

संपादन

स्वामींचे खरे नाव रामचंद्र होते परंतु ते "आप्पा" किंवा "रामभाऊ" यानावाने लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी पावस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री. विष्णूपंत गोडबोले आणि आईचे नाव सौ. रखमाबाई गोडबोले होते. रामभाऊ (आप्पा) यांचे प्राथमिक शिक्षण पावसमध्ये आणि माध्यमिक शिक्षण रत्‍नागिरी येथे झाले. १९१९ साली त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये प्रवेश केला होता. या शाळेत विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक प्रशिक्षण देण्यात येत असे.

प्रकाशने

संपादन

सेवा मंडळातर्फे स्वामी स्वरूपानंद लिखित खालील ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यात आली आहे.

  • अभंग ज्ञानेश्वरी
  • संजीवनी गाथा