स्वाती दामोदरे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
डॉ. स्वाती दामोदरे (जन्म सप्टेंबर १९७२) या मराठीतील स्त्रीवादी लेखिका आणि कथाकार आहेत. अकोला येथील एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापक आहेत. ‘वैद्यकीय लेखन आणि डॉक्टरांची आत्मकथने’ हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विशेष आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांना पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे.
शिक्षण
संपादनडॉ. स्वाती दामोदरे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. डॉ दीपक दामोदरे यांच्याशी विवाहानंतर त्या अकोला येथे स्थायिक झाल्या. डॉ दीपक दामोदरे हे इंग्रजी भाषेचे प्राध्यापक व मुक्त पत्रकार आहेत
व्यवसाय
संपादनआयुर्वेद या वैद्यकशाखेची पदवी डॉ. दामोदरे यांनी प्राप्त केली आहे. अकोला येथे त्यांनी बारा वर्षे वैद्यकीय सेवा दिली. या दरम्यान त्यांनी मराठी व मानसशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. मराठी भाषा व साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि आचार्य पदवीसाठी संशोधन केले.
लेखन
संपादनशालेय जीवनापासून स्वाती दामोदरे यांनी लेखनाला प्रारंभ केला. जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगातील नाट्य, कारुण्य, विनोद आणि सौंदर्य यांनी स्वाती यांच्या लेखनात शब्दरूप मिळवले आहे. विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून हे लेखन प्रकाशित झाले आहे.
ग्रंथलेखन
संपादन२०१२ साली स्वाती दामोदरे यांचा ‘शब्दमंजिरी’ हा ललितलेख संग्रह प्रकाशित झाला. पुणे येथील गमभन प्रकाशन संस्थेने हा संग्रह प्रकाशित केला आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा व साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ‘वाणिज्यमित्र’ हा ग्रंथ लिहीला आहे. उत्तमकथा, शब्दरुची आणि इतर महत्त्वाच्या नियतकालिकांत दामोदरे यांचे लेखन प्रकाशित होत असते.
सन्मान
संपादनडॉ स्वाती दामोदरे यांना लेखनासाठी २०१६ साली डॉ दंडाळे स्मृती राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे.