स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा

(स्वतंत्रतादेवीचा पुतळा या पानावरून पुनर्निर्देशित)

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (इंग्लिश: Statue of Liberty) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील लिबर्टी आयलंड वर उभारण्यात आलेली एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ फ्रान्सकडून अमेरिकेला भेट मिळालेल्या ह्या पुतळ्याचे २८ ऑक्टोबर १८८६ रोजी उद्‌घाटन करण्यात आले. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेऊन उभ्या असलेल्या एका स्त्रीचा हा पुतळा अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतो.

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा

जुन्या काळात युरोपातून बोटीने अमेरिकेत येणाऱ्या लोकांना अमेरिकेचे पहिले दर्शन स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याद्वारे होत असे. आजही हा पुतळा अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.

१५१ फूट उंच असलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या उजव्या हातात ज्योत असून डाव्या हातात पुस्तक आहे. त्यावर ४ जुलै १७७६ ("July IV MDCCLXXVI") ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख लिहिलेली आहे. पुतळ्याची पाया धरून उंची ३०५ फूट असून पुतळ्याच्या मुकुटात ज्या ७ खिडक्या आहेत, त्या जगातील ७ खंड दर्शवतात. उजव्या हातातील ज्योत प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक ज्ञान दर्शवते. १८७० मध्ये जुलेस जोसेफ लेफेब्व्रेचे 'ला वेरेत' हे चित्र 'स्वातंत्र्यदेवतेचा पुतळ्याशी' मिळतेजुळते आहे. २.४ मिलिमीटर जाडीच्या तांब्याच्या पत्र्यापासून हा संपूर्ण पुतळा बनवलेला असून आतून त्याला लोखंडाच्या/ स्टीलच्या पट्ट्यांचा आधार दिला आहे.

पुतळ्याचा तपशील

संपादन
वर्णन[] इंग्लिश एकक मेट्रिक एकक
तांब्याच्या पुतळ्याची उंची 151 फूट १ इंच ४६ मीटर
पायथ्यापासून मशालीच्या ज्योतीची उंची 305 फूट १ इंच ९३ मीटर
पायापासून डोक्यापर्यंत उंची 111 फूट 1 इंच ३४ मीटर
शीर 16 फूट 5 इंच ५ मीटर
तर्जनी 8 फूट 1 इंच 2.44 मीटर
दुसऱ्या जोडाचा परीघ 3 फूट 6 इंच 1.07 मीटर
हनुवटी ते शिरोभाग 17 फूट 3 इंच 5.26 मीटर
शिराची जाडी 10 फूट 0 इंच 3.05 मीटर
दोन डोळ्यांतील अंतर 2 फूट 6 इंच 0.76 मीटर
नाक 4 फूट 6 इंच 1.48 मीटर
उजवा हात 42 फूट 0 इंच 12.8 मी
उजव्या हाताची जाडी 12 फूट 0 in 3.66 मीटर
मनगट 35 फूट 0 in 10.67 मीटर
मुख 3 फूट 0 इंच 0.91 मीटर
चबुतरा 89 फूट 0 इंच 27.13 मीटर
पायथा 65 फूट 0 इंच 19.81 मीटर
तांब्याचे वजन 60,000 पाउंड 27.22 मेट्रिक टन
लोखंडाचे वजन 250,000 पाउंड 113.4 मेट्रिक टन
एकूण वजन 450,000 पाउंड 204.1 मेट्रिक टन
तांब्याच्या पत्र्याची जाडी 3/32 इंच 2.4  मिलिमीटर

गॅलरी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Statistics". Statue of Liberty. 2010-07-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: