स्मिता तळवलकर
स्मिता तळवलकर (माहेरच्या स्मिता गोविलकर) ( ५ सप्टेंबर, इ.स.१९५५ - ६ ऑगस्ट २०१४) [१]) ह्या मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक होत्या. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या १७ वर्षे वृत्तनिवेदिका होत्या.
स्मिता तळवलकर | |
---|---|
जन्म |
स्मिता तळवलकर ५ सप्टेंबर १९५५ |
मृत्यू |
६ ऑगस्ट २०१४ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र ॲकॅडमीची स्थापना केली होती. या ॲकॅडमीत मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून नाट्य-चित्रपटाचे प्रशिक्षण घेता येते.
स्मिता तळवलकर या तळवलकर जिम्नॅशियमचे संस्थापक-चालक यांच्या कुटुंबातल्या एक होत्या. त्यांचा मुलगा अंबर हा जिम्नॅशियमचा एक निर्देशक आहे.
वैयक्तिक जीवन
संपादनतळवलकर यांचे वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झाले.[२] तिचा मुलगा अंबर तळवलकर, तळवलकर या भारतातील हेल्थ क्लबची प्रमुख शृंखला असलेल्या संचालकांपैकी एक आहे. अंबरचे लग्न अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिच्याशी झाले आहे.[३] स्मिताची दुसरी सून म्हणजे दूरदर्शन अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर, औपचारिकपणे पूर्णिमा भावे म्हणून ओळखली जाते.
स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले चित्रपट
संपादन- अडगुलं मडगुलं
- एक होती वाडी
- गडबड घोटाळा
- चेकमेट
- चौकट राजा (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
- जन्म
- टोपी घाला रे
- तू सौभाग्यवती हो
- धाकटी सून
- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
- या गोल गोल डब्यातला
- शिवरायांची सून ताराराणी (भूमिका - येसूबाई)
- श्यामचे वडील
स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले नाटक
संपादन- गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या (भूमिकेचे नाव - जनाबाई)
स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेले चित्रपट
संपादन- आनंदाचे झाड
- कळत नकळत (१९८९) (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
- चौकट राजा (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
- तू तिथे मी (१९९८) (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
- सवत माझी लाडकी (महाराष्ट्र राज्य पुरस्कारविजेता चित्रपट)
- सातच्या आत घरात
स्मिता तळवलकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
संपादन- सवत माझी लाडकी (महाराष्ट्र राज्य पुरस्कारविजेता चित्रपट)
स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
संपादन- अर्धांगिनी
- अवंतिका
- उंच माझा झोका
- ऊनपाऊस
- कथा एक आनंदीची
- घरकुल
- पेशवाई
- सुवासिनी (स्टार प्रवाह पुरस्कारप्राप्त)
मिळालेले पुरस्कार
संपादन- राष्ट्रीय पुरस्कार – कळत नकळत
- राष्ट्रीय पुरस्कार – तू तिथे मी
- महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार – सवत माझी लाडकी (१९९२) – दुसऱ्या क्रमांकाचा उत्कृष्ट चित्रपट
- महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार – तू तिथे मी
- महाराष्ट्र शासनाचा व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार (२०१०)
- मटा सन्मान- उत्कृष्ट मालिका - सुवासिनी (२०१२)
- स्टार प्रवाह पुरस्कार - सुवासिनी
मृत्यू
संपादन२०१० मध्ये स्मिता तळवलकर यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि त्यांच्यावर केमोथेरपीने उपचार करण्यात आले.[४][५] ६ ऑगस्ट २०१४ रोजी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये वयाच्या ५९ व्या वर्षी तिचे निधन झाले.[६][७]
संदर्भ
संपादन- ^ http://prahaar.in/mahamumbai/237264 Archived 2015-10-22 at the Wayback Machine. या दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- ^ "Smita Talwalkar: Live wire of positive energy | iGoa". web.archive.org. 2014-04-06. रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-04-06. 2024-04-11 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "This is how you do it". www.dnaindia.com (इंग्रजी भाषेत). 2024-04-11 रोजी पाहिले.
- ^ "Cancer patients speak of benefit of homeopathy treatment - Times Of India". web.archive.org. 2011-09-10. 2011-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-04-11 रोजी पाहिले.
- ^ Mirror, Pune (१८ फेब्रुवारी २०१३). "Words of the Wise". Pune mirror. रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-02-18. 2024-04-11 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Veteran Marathi actress Smita Talwalkar passed away" (इंग्रजी भाषेत). 2014-08-06. ISSN 0971-751X.
- ^ "Veteran Marathi actress Smita Talwalkar passes away at 59". DNA India (इंग्रजी भाषेत). 2024-04-11 रोजी पाहिले.