स्टेडियम ऑस्ट्रेलिया
स्टेडियम ऑस्ट्रेलिया (अधिकृत नाव: ए.एन.झेड. स्टेडियम) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. हे स्टेडियम मार्च १९९९ साली २००० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधले गेले. सुमारे ८२,५०० इतकी आसनक्षमता असणारे हे मेलबर्न क्रिकेट मैदानाखालोखाल ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे.
स्टेडियम ऑस्ट्रेलिया | |
---|---|
ऑलिंपिक स्टेडियम | |
पूर्ण नाव | ए.एन.झेड. स्टेडियम (ANZ स्टेडियम) |
स्थान | सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया |
उद्घाटन | ६ मार्च १९९९ |
बांधकाम खर्च | ६९ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर |
आसन क्षमता |
८२,५०० १.१ लाख (२००० उन्हाळी ऑलिंपिक) |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
२००० उन्हाळी ऑलिंपिक न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज (२००८ - २०११) सिडनी थंडर (२०१२) २०१५ ए.एफ.सी. आशिया चषक |
सध्या हे स्टेडियम रग्बी लीग, रग्बी युनियन, फुटबॉल, ऑस्ट्रेलियन फुटबॉल, क्रिकेट इत्यादी खेळांसाठी वापरले जाते.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत