स्कॉटलंडचा जेम्स पहिला
जेम्स पहिला (जुलै १३९४ च्या अखेरीस – २१ फेब्रुवारी, १४३७) हा १४०६पासून १४३७ मध्ये त्याच्या हत्येपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता. हा रॉबर्ट तिसरा आणि अॅनाबेला ड्रमंड यांच्या तीन मुलांपैकी सगळ्यात धाकटा होता.. जेम्सचा सगळ्यात मोठा भाऊ डेव्हिड, रोथेसचा ड्यूक हा त्याच्या काका रॉबर्ट, आल्बनीचा ड्यूकच्या ताब्यात असताना संशयास्पद परिस्थितीत मरण पावला. जेम्सचा दुसरा भाऊ रॉबर्ट लहानपणीच मरण पावला. १४०५/६ च्या हिवाळ्यात जेम्सच्या जीवाची रक्षा करण्यासाठी त्याला फ्रान्सला पाठवण्याची योजना आखण्यात आली. मार्चच्या मध्यास तो फ्रान्सला निघाला परंतु २२ मार्च रोजी, इंग्रज चाच्यांनी त्याचे जहाज ताब्यात घेतले आणि जेम्सला इंग्लंडच्या चौथ्या हेन्रीच्या ताब्यात दिले. जेम्सचे वडील ४ एप्रिल रोजी आजाराने मरण पावल्यावर ११ वर्षांचा जेम्स सिंहासनाशिवायचा राजा झाला. यापुढे आणखी अठरा वर्षे जेम्स याच अवस्थेत राहिला.
संदर्भ
संपादन- ^ Based on text information in Early Stewart Kings by Stephen Boardman, p. 282 and some information in map in A Companion to Britain in the Later Middle Ages by S. H. Rigby p. 304