सोभुझा दुसरा
सोभुझा दुसरा, (स्वाझी भाषा: [sɔbʱuzʱa]) तथा न्खोटफोट्येनी [१] [२] (२२ जुलै, १८९९ - २१ ऑगस्ट, १९८२) हा इस्वाटिनीचा (स्वाझीलंड) राजा होता. हा ८२ वर्षे २५४ सत्तेवर होता. हा सत्त्ताकाळ जगातील सर्वाधिक आहे.
सोभुझा न्ग्वाने पाचवा आणि त्याची राणी लोमावा न्डवांडवे यांचा मुलगा होता. एका नृत्यसमारंभात न्ग्वानेचा अचानक मृत्यू झाल्यावर सोभुझाला राजा घोषित केले गेले. सोभुझाची आजी लाबोत्सिबेनी आणि काका मालुंगे यांनी त्याच्या नावाने १९२१ सालापर्यंत राज्य चालवले.[३] १९६७मध्ये ब्रिटिश सरकारने सोभुझाला राजा म्हणून अधिकृत मान्यता दिली आणि १९६८मध्ये स्वाझीलँडला स्वातंत्र्य मिळाले.
याला आपल्या अनेक पत्नी व दासींसोबत सुमारे २१० मुले झाली. त्याच्या मृत्युसमयी त्याला १,०००पेक्षा जास्त नातवंडे होती.[४][५]
सोभुझा आपल्या मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. त्याच्यानंतर त्याचा मुलगा म्स्वाती तिसरा राजा झाला.
संदर्भ
संपादन- ^ SNTC. "CULTURAL RESOURCES: King Sobhuza II". 2 March 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 February 2015 रोजी पाहिले.
- ^ Kuper, Hilda (1986). The Swazi: A South African Kingdom (2nd ed.). CBS College Publishing. p. 15.
- ^ Platter, John (13 August 1979). "Long Live the King: Sobhuza II of Swaziland Looks Back on 80 Years and 100 Wives". People. 3 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 November 2013 रोजी पाहिले.
- ^ NY Times obituary mentions among other honorifics in passim
- ^ Swaziland National Trust Commission. "Succession in Swazi Kingship". Sntc.org.sz. 25 July 2001 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 November 2013 रोजी पाहिले.