सोनेगाव तलाव आणि मंदिर

इतिहास

संपादन

सोनेगाव तलाव सुमारे २५० वर्षापूर्वी नागपूरच्या भोसले घराण्याच्या शासनकाळात भोसल्यांनी बांधला. सोनेगाव शिवारात असल्यामुळे याचे नाव सोनेगाव पडले. पूर्वी हा एक विस्तीर्ण तलाव होता. त्या तलावाच्या पश्चिमेस सध्या इमारती बांधण्यात आल्या आहेत, त्यामुळे तो आकारमानाने आता अर्धाच शिल्लक राहिला आहे. मात्र या तलावाचा दगडी बांध अद्यापही मजबूत आहे. या तलावाचा वापर भोसले घराण्यातील लोक सहलीसाठी करीत, व ८-१० दिवस येथे येऊन रहात. शेजारी बांधण्यात आलेल्या विहिरीत हत्ती-घोडे आत जाऊन पाणी पिऊ शकत. जवळच भोसल्यांनी पोहण्याचे टाके बांधले होते.. या टाक्यात तलावातून पाणी सोडण्यात येत असे. त्याची पाईपलाईन सध्याही अस्तित्वात आहे.

सध्याचे वास्तव

संपादन

सध्या हा तलाव सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणार आहे. त्यातील गाळ काढणे, प्रदूषण रोखणे, सौंदर्यीकरण इत्यादी गोष्टी करण्यात येणार आहेत. तलावास कुंपण, हरितपट्टा विकसित करणे इत्यादी कामेही करण्यात येणार आहेत.

पाणीपुरवठा

संपादन

हा तलाव पाणीपुरवठ्यासाठी वापरण्याचा स्थानिक महानगरपालिकेचा काहीच प्रस्ताव नाही कारण येथील पाणी दूषित झाले आहे.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन