सोनाबाई चिमाजी केरकर
सोनाबाई चिमाजी केरकर (नोव्हेंबर ९, १८८० - इ. स.१८९५)[१] ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार मानल्या जात, परंतु काशीबाई फडके या पहिल्या स्त्री नाटककार असे नंतर सिद्ध झाले[१]. त्यांचा जन्म गोव्यातील कलावंत समाजातील कुटुंबात झाला होता. त्यांचे शिक्षण मुंबईतील मिशन शाळेत झाले होते. संगीत संभाजी हे १८९१मध्ये आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी लिहिलेले, आणि रंगभूमीवर गाजत असलेले नाटक पाहून सोनाबाईंना आपणही नाटक लिहावे असे वाटू लागले. त्यानंतर त्यांनी सन १८९६मध्ये त्यांनी संगीत छत्रपती संभाजी हे नाटक लिहिले.[१]