सेवाभारती ही महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात स्थापन झालेली एक स्वयंसेवी संस्था आहे.[ संदर्भ हवा ]

पार्श्वभूमी व उद्दिष्टे

संपादन

इचलकरंजी ही एक वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून देखील ही गणली जाणारी नगरी. हिच्या सभोवताली अनेक लहान आणि शेतीप्रधान खेडी आहेत. ही वस्त्रोद्योग नगरी असल्याने येथे जास्त करून गरीब यंत्रमाग कामगार आणि कारखान्यांचे मालक अशा प्रकारचा रहिवासी वर्ग आहे.[ संदर्भ हवा ]

इचलकरंजी आणि त्याच्या आसपासचे हे गरीब कामगार व शेतमजूर यांच्यासाठी तेथे आरोग्य आणि शिक्षणसेवा याची अत्यंत गरज वाटू लागली. या गरजेमधून सन १९८९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने इचलकरंजी येथे सेवाभारती हा प्रकल्प सुरू झाला. सेवाभारतीने यंत्रमाग कामगार आणि शेतमजूर या समाजातील घटकांसाठी आरोग्य व शिक्षणसेवा पुरवण्याचे व्रत स्वीकारले.[ संदर्भ हवा ]

डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी

संपादन

सेवाभारतीने सुरुवातीला प्राथमिक उपचारांसाठी डॉ हेडगेवारांच्या नावाचे एक फिरते रुग्णालय चालू केले. त्यामार्फत इचलकरंजी येथील सेवावस्ती व शहराच्या परिसरातील आठ खेड्यांमध्ये आरोग्य सेवा सुरू केली. सन १९९६ पासून ही सेवा अखंडपणे सुरू आहे. कामाची नैसर्गिक गरज म्हणून रोगपरीक्षण प्रयोगशाळा, वेळोवेळी गरजेनुसार आरोग्यशिबिरे, शहरामध्ये स्थायी बाह्यरुग्ण विभाग, डे केर वॉर्ड, मिरजेच्या विवेकानंद नेत्र रुग्णालयच्या साहाय्याने नेत्रविकार उपचार, शहरातील काही तज्‍ज्ञ डॉकटरांच्या मदतीने पॉलिक्लिनिक हे प्रकल्प सुरू झाले. दरवर्षी सुमारे १०,००० रुग्ण या सेवांचा लाभ घेतात. सेवाभारतीने दिनांक २६ जून २०११ रोजी डॉ. हेडगेवार रुग्णालयाची स्थापना केली. [ संदर्भ हवा ]

संदर्भ

संपादन