सूर्याजी पिसाळ (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक) हा दख्खनेतील (वर्तमान महाराष्ट्रातील) वाई प्रांताचा देशमुख होता. हा आपल्या राजकीय कारकिर्दीत, मराठेशाहीतील सुर्याजी पिसाळ हा गद्दार मराठा सरदार होता. त्याने संभाजी महाराजांना फंद फितुरी करून औरंगजेबाच्या कचाट्यात अडकवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्याची राजधानी मुघल सरदार झुल्फिकार खानच्या ताब्यात आली. छत्रपती राजाराम इतर सरदारांसह जिंजीला गेल्यानंतर महाराणी येसूबाई राजधानी किल्ल्याचा कारभार पाहत होत्या. सूर्याजी पिसाळ हिंदवी स्वराज्याविरुद्धच्या या मुघल वेढामध्ये झुल्फिकार खानासोबत सामील झाला.

घटनाक्रम असा- संभाजीराजे गिरफ़्तार राजारामांचे मंचकारोहण १ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी छ संभाजी संगमेश्वराजवळ अलकनंदा व वरुणा या नद्यांचे संगमावरील नावडी येथे होते.मोंघल सरदार शेख निजाम तथा मुकबर्रखानने चकमकीनंतर त्यांना पकडले. संताजी घोरपडे यांचे वडील आणि शिवकालिन सरदार मालोजी घोरपडे त्यावेळी ठार झाले. रायगडावर ९ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम अटकेत असताना ही वार्ता कळाली. त्याची सुटका होऊन राजारामांनी ’ मंचकारोहण’ केले.


संदर्भ

संपादन
  • मराठा रियासत -गो.स.सरदेसाई
  • सूर्याजी पिसाळ-औरंगजेब पत्रव्यवहार