सुसरी नदी धरण हे सुसरी नदीवरील धरण आहे. हे धरण महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात उभारले जाणार आहे. या धरणासाठी इ.स. १९७१ साली पहिल्यांदा सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर इ.स. १९७६ साली दुसरे, तर इ.स. २००९ साली तिसरे सर्वेक्षण केले गेले. याला महावीर बंधारा असेही नाव आहे.

विरोध

संपादन

या धरणामुळे मौजे रानशेत, आवढाणी, महालक्ष्मी, धानिवरी, दहीगाव, ओसूर, असरविरा, नवनाथ आणि गणेशबाग (रानशेत) येथील आदिवाश्यांच्या जमिनी व वनजमिनीचे सुमारे १००० हेक्टर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. यामुळे समस्याग्रस्त समाजघटकांनी सुसरी धरणविरोधी संघर्ष समिती या समितीच्या माध्यमातून विरोध दर्शवण्याचे प्रयत्न चालू राखले आहेत[]

संदर्भ

संपादन
  1. ^ प्रसाद आळशी. "सुसरी धरणावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली". १६ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]