सुश्रुत
सुश्रुत हे प्राचीन काळातील भारतीय शल्यविशारद होते. सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.छेदन, भेदन, लेखन, आहरण , व्याधन, इसण, स्रवण, शिवण या त्या आठ क्रिया होत.[१]
गंगा नदीच्या काठी जिथे आजचे वाराणसी शहर वसले आहे त्याच परिसरात सुश्रुतांनी आपल्या विद्येचा अभ्यास तसेच प्रसार केला. शल्यक्रियेमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे सुश्रुत शल्यक्रियेचे पितामह म्हणून ओळखले जातात.
विविध प्रकारचे गोळे(ट्यूमर), शरीरांतर्गत झालेली किंवा बाहेरून झालेले इजा, अस्थिभंग व गर्भारपण/ बाळंतपणातील त्रास व त्याचेसाठीची शल्यक्रिया, आतड्याची शल्यक्रिया आदी शस्त्रक्रिया सुश्रुतांनी विकसित केल्या. त्यांना कॉस्मेटिक सर्जरीचे जनक समजल्या जाते. [२]
जेंव्हा औषोधोपचाराने रोगी ठिक होत नाही तेंव्हा काही रोगात शल्यक्रिया आवश्यक असते असे त्यांचे म्हणणे होते. अर्बुद, गंडमाला, मूळव्याध, मुत्राश्मरी, गुदभ्रंश, स्तनरोग आदी व्याधींमध्ये कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांचे वर्णन त्यांनी त्यांच्या सुश्रुत संहिता या ग्रंथात केले आहे. शस्त्रक्रियेआधी काय तयारी करावयास हवी, इतर प्रक्रिया, शरीरातील मर्मे सुंगणी शल्यक्रियेनंतर करावयाचे उपचार याचीपण माहिती या ग्रंथात आहे. ते शस्त्रक्रियेनंतर जखम शिवण्यास रेशिम, गुळवेल किंवा अस्मांतक वृक्षाचा धागा वापरत. त्यांनी हजारो वर्षाआधी शल्यक्रियेचा पाया घातला.[३]
(आयुर्वेद)
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत