सुरु
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
खारट उष्ण आणि दमट हवामानात चांगला वाढणारा हा एक वृक्ष कॉजूआरीना हे नाव न्यू गिनी आणि ओस्ट्रेलिया येथे आडळनाऱ्या कासुवारीस या उड्डाण विहीन पक्षाच्या नावावरून पडले आहे .या झाडाची पाने या पक्षासारखी दिसतात .त्याच्या इक्विसेटम या वनस्पतीशि असलेल्या साधर्म्यामुळे त्याचे नाव इक्विसेटीफोलीया .मुळचा ओस्ट्रेलियाचा असला तरी इंडोनेशिया ते मलेशिया व भारत श्रीलंका येथेही मोठ्या प्रमाणात आडळतो .भारतामध्ये प्रथम याची कर्नाटकातील कारवार मध्ये लागवड केली गेली तेथून तो सर्वत्र पसरला ८० -९० फुटापर्यत सरळ सोट वाढणारा हा वृक्ष वर्षातून दोनदा फुलतो .एकदा फेब्रुवारी ते एप्रिल व एकदा सप्टेंबर ते ऑक्टोबर .मात्र फुले थोडीशी वेगळीच असतात .एकाच झाडावर दोनी प्रकारचे फुले येतात नर फुले व माधी फुले .नर फुले ही लालसर मांजरीच्या शेपटी सारखी असतात .फांदीच्या टोकाला तर मादी फुले ही त्याच फांदीच्या शेवटी पाइन वृक्षाच्या कोनासारखी येतात .याची पाने सुईसारखी असल्यामुळे बऱ्याच वेळा लांबून हा वृक्ष पाइन वृक्षासारखा भासतो सागर किनाऱ्या वरची जमिनिची धूप थांबवण्यासाठी जरी याची लागवड केली जाती झाड सरळ वाढत असल्यामुळे त्याची खोडापासून विजेचे मोठे खांब बनवले जातात.याच्या लाकडाचाचा उपयोग कागद बनवण्यासाठी होतो .खारफुटीच्या झाडापासून मिळणाय्रा टॅनीन पेक्षा ही उत्तम प्रकारच्ये टॅनीन सुरूच्या खोडापासून मिळते .विशेष म्हणजे या झाडाच्या मुळावर गाठी असतात .या गाठी मध्ये नायट्रोजनचे शोषण करणारे बॅक्ठ्येरीया असतात या झाडाचा उपयोग नायट्रोजन शोषण व नायट्रोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी होतो कदाचित या गुणधर्म मुळे ये झाड गुणधर्म मुळे मातीत ही चांगले येते झाडाची लागवड ही बिया पासून होते एक झाड एका मोसमात लाखो बिया तयार करते या बिया वजनाने हलके असल्यामुळे वाऱ्यामार्फत त्याचे प्रसारण होते .
संदर्भ
संपादनवृक्षराजी मुंबईची:मुग्धा कर्णिक