सुन यात-सेन

(सुन यात्सेन या पानावरून पुनर्निर्देशित)
हे चिनी नाव असून, आडनाव सेन असे आहे.

सन यत-सेन (मराठी लेखनभेद: सुन यात-सन ; चिनी: 孫逸仙 ; फीनयिन: Sūn Yìxiān ; वेड-जाइल्स: Sun I-hsien ; कांतोनी: Sun Yat-sin ) (१२ नोव्हेंबर, इ.स. १८६६; श्यांगषान, क्वांग्तोंग, चीन - १२ मार्च, इ.स. १९२५ ; पेइचिंग, चीन) हा चिनी क्रांतिकारक व चीनच्या प्रजासत्ताकाचा अध्यक्ष होता. चिनी साम्राज्यावरील छिंग घराण्याच्या अमलाविरुद्ध इ.स. १९११ साली झालेल्या लोकशाहीवादी आंदोलनाचा हा प्रणेता होता. इ.स. १९१२ साली चीनचे प्रजासत्ताक स्थापन झाल्यावर नवनिर्मित प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा याच्यावर सोपवण्यात आली. इ.स. १९१९ साली स्थापलेल्या कुओमिंतांग पक्षाचा हा सहसंस्थापक व पहिला पक्षनेता होता. साम्राज्योत्तर काळात चीनचे एकीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला सुन तायवान सामुद्रधुनीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील समाजांत महनीय मानला जाणारा इ.स.च्या २०व्या शतकातील एकमेव चिनी राजकारणी आहे. याला चीनच्या प्रजासत्ताकात "राष्ट्रपिता", तर चीनच्या जनता-प्रजासत्ताकात "लोकशाहीवादी क्रांतीचा प्रणेता" मानले जाते.

सुन यात-सेन

बाह्य दुवे

संपादन

डॉ सन-यत-सेन हा चीनला नवीन दिशा प्राप्त करून देणारा महान निस्वार्थी देशभक्त होता त्याने देशात अनेक सुधारणा आणि देशाला प्रजकासत्ता करण्यासाठी अथक प्रयत्न केले या त्याच्या कार्यलाच खऱ्या अर्थाने क्रांतीची झलक दिसते.