सुनेत्रा पवार
मराठी राजकारणी
सुनेत्रा पवार (१८ ऑक्टोबर, १९६३:धाराशिव, महाराष्ट्र, भारत - ) या महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत. त्या २०२४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या म्हणून महाराष्ट्रातून राज्यसभेच्या खासदार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या पत्नी आहेत.
मराठी राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
सुनेत्रा पवार बारामती टेक्सटाईल कंपनीच्या चेरपर्सन आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या मुख्याधिकारी आहेत. त्यांना जय पवार आणि पार्थ पवार ही दोन मुले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या बारामतीमधून लोकसभेच्या उमेदवार होत्या. [१] [२] [३]
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पदमसिंह पाटील हे त्यांचे भाऊ आहेत.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Sunetra Pawar eyes ministerial berth in Modi govt as she is set to be Rajya Sabha MP". The Indian Express. 15 June 2024. 28 June 2024 रोजी पाहिले.
- ^ The Hindu Bureau (18 June 2024). "Ajit Pawar's wife Sunetra elected Rajya Sabha member". The Hindu. 28 June 2024 रोजी पाहिले.
- ^ Nair, Ardhra (11 June 2024). "City NCP unit seeks RS seat, MoS post for Sunetra Pawar". The Times of India. 28 June 2024 रोजी पाहिले.