सुनील शेट्टी

आभिनेता

सुनील शेट्टी (जन्म - ११ ऑगस्ट १९६१ - हयात) हा हिंदी चित्रपटातील अभिनेता, निर्माता तसेच हॉटेल व्यावसायिक आहे. त्याने अनेक विनोदी तसेच एक्शन चित्रपटात भूमिका केल्या आहेत. दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा हे त्याचे प्रमुख चित्रपट आहेत. धडकन या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी सुनील ला २००१ या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. हेरा फेरी चित्रपटातील 'श्याम' तसेच आवारा पागल दिवाना चित्रपटातील 'येडा अन्ना' या त्याच्या भूमिका लोकांनी विशेष पसंत केल्या. अक्षय कुमार सोबत त्याने अनेक चित्रपट केले व बहुदा सर्वच चित्रपट यशस्वी ठरले. अक्षय कुमार व सुनील शेट्टी या जोडीला भरपूर लोकप्रियता मिळाली.

सुनील शेट्टी
सुनील शेट्टी
जन्म सुनील शेट्टी
११ ऑगस्ट १९६१
कर्नाटक, भारत
इतर नावे अन्ना
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट भाई, हेरा फेरी, धडकन
पुरस्कार फिल्मफेअर (सर्वोत्कृष्ट खलनायक) (२००१)
अपत्ये अथिया शेट्टी

चित्रपट अभिनय खेरीज सुनील शेट्टी स्वतः चे उडपी खानावळ (रेस्तोरांत) व रेडीमेड कपड्यांचे दालन देखील चालवितो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.