सुधीर मुनगंटीवार
(सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार या पानावरून पुनर्निर्देशित)
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ( ३० जुलै १९६२ ) हे महाराष्ट्र राज्यातील आमदार आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या ३ खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत. यापूर्वी २०१४-१९ च्या फडणवीस सरकारमध्ये ते अर्थ आणि नियोजन व वन खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्यापूर्वी, २०१०-१३ पर्यंत भारतीय जनता पक्षाचे (महाराष्ट्र) प्रदेशाध्यक्ष होते. १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्र सरकारमधील ग्राहकसंरक्षण व पर्यटन राज्यमंत्री होते. सन २०१४ मध्ये ते सलग ५व्यांदा/ वेळासाठी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत, वर्धा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून अतिरिक्त कार्यभारही आहे.
विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्य | |
सुधीर मुनगंटीवार | |
कॅबिनेट | |
वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |