सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ( ३० जुलै १९६२ ) हे महाराष्ट्र राज्यातील आमदार आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या ३ खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत. यापूर्वी २०१४-१९ च्या फडणवीस सरकारमध्ये ते अर्थ आणि नियोजन व वन खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्यापूर्वी, २०१०-१३ पर्यंत भारतीय जनता पक्षाचे (महाराष्ट्र) प्रदेशाध्यक्ष होते. १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्र सरकारमधील ग्राहकसंरक्षण व पर्यटन राज्यमंत्री होते. सन २०१४ मध्ये ते सलग ५व्या टर्मसाठी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत, वर्धा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून अतिरिक्त कार्यभारही आहे.

विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्य
सुधीर मुनगंटीवार
कॅबिनेट
वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय