सुधीर नरहर रसाळ
डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६ पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. रसाळ हे सन १९९० ते १९९३ या काळात औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख होते.[१]
ग्रंथसंपदा
संपादन- कविता आणि प्रतिमा
- कवितानिरूपणे
- काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली
- ना.घ. देशपांडे यांची कविता
- मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण
- मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप
- मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्म वाङ्मय
- लोभस : एक गाव काही माणसंं (व्यक्तिचित्रे)
- वाङ्मयीन संस्कृती
- समीक्षक भालचंद्र नेमाडे
- साहित्य अध्यापन आणि प्रकार : सहसंपादन (प्रा. वा. ल. कुलकर्णी गौरवग्रंथ)
- अशोक कीर्तकीर पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे दिला जाणारा गौरवमूर्ती पुरस्कार
- चारठाणकर प्रतिष्ठानचा पुरस्कार
- मराठवाडा साहित्य परिषदेचा १ला जीवनगौरव पुरस्कार
- प्रा. रा.श्री. जोग पुरस्कार
- पद्मजा बर्वे पुरस्कार
- ’वाटा कवितेच्या' कार्यक्रमात दिला जाणारा, परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा २०१४ सालचा शब्द सह्याद्री साहित्य सन्मान
- साहित्य समीक्षा पुरस्कार
- अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्कार (२०२१)
संदर्भ
संपादन- ^ प्रतिष्ठान (सुधीर रसाळ विशेषांक), मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद