सुजाता नहार
सुजाता नहार (१२ डिसेंबर, १९२५ - ४ मे, २००७) या भारतीय लेखिका होत्या.
बालपण
संपादनयांचा जन्म कलकत्ता येथे झाला आणि त्यांना त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्या रवींद्रनाथ टागोर यांच्या सान्निध्यात होत्या. आईच्या निधनानंतर वडील पृथ्वीसिंग नहार हे श्रीअरविंद आश्रमात आले, त्यांच्या सोबत सुजाता नहार, वयाच्या नवव्या वर्षी, १९३५मध्ये त्या श्रीअरविंद आश्रमात आल्या.[१] पुढे त्यांनी श्रीमाताजींचे शिष्य पवित्र यांच्या सचिव म्हणून काम केले. श्रीमाताजी प्रणीत नवीन प्रकारच्या शारीरिक शिक्षणामध्ये सुजाता यांचा सक्रिय सहभाग होता.
लेखन
संपादनद मदर्स अजेंडा
संपादन१९५४ पासून सत्प्रेम श्रीमाताजींबरोबर होणाऱ्या संवादाचे शब्दांकन करत असत. तेच लिखाण पुढे द मदर्स अजेंडा या नावाने प्रकाशित करण्यात आले. या लिखाणाचे टंकलेखन करण्याची जबाबदारी सुजाता नहार यांच्यावर सोपविण्यात आली.[२] १९६५ ते १९७३ या कालावधीत सुजाता नियमितपणे सतप्रेमसोबत श्रीमाताजींच्या भेटीला जात असत.[३]
१९७८ मध्ये सत्प्रेम आणि सुजाता आश्रमापासून दूर राहून, द मदर्स अजेंडा (श्रीमाताजींबरोबरील संवाद) या १३ खंडांच्या पुस्तक-प्रकल्पावर काम करू लागले. २००७ पर्यंत त्या या प्रकल्पावर आणि स्वतःच्या साधनेमध्ये निमग्न होत्या.[१]
मदर्स क्रॉनिकल्स
संपादननंतर, सुजाता यांनी 'मदर्स क्रॉनिकल्स' या नावाने श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या वरील अष्ट-खंडात्मक चरित्र लिहिले.[४] त्यातील सहा खंड इंग्रजीत प्रकाशित झालेले आहेत. ते पुढीलप्रमाणे -
१. मीरा, १९८५
२. मीरा - द आर्टिस्ट, १९८६, ISBN 2·902776·20 ·9
३. मीरा - द ऑकल्टिस्ट, १९८९, ISBN 2·902776·21-7
४. मीरा - श्रीअरबिंदो, १९९५, ISBN 2-902776-3 5-7 & 81-85137-08-0
५. मीरा - इन जपान, १९९७, ISBN 2·902776·48·9 & 81·85137-28·5
६. मीरा - द मदर, २००१, ISBN 2-902776-69-1 & 81-85137-72-2
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b "Personalia / Sujata Nahar". sri-aurobindo.co.in. 2023-03-29 रोजी पाहिले.
- ^ Satprem (1980). Mother's Agenda - 1967, Vol 08. Paris: Institut de Recherches Evolutives.
- ^ Satprem (1978). Mother's Agenda 1951-1960 Part 01. Institut de Recherches Evolutives.
- ^ सुजाता नहार. मदर्स क्रॉनिकल्स. पॅरिस: इन्स्टिट्यूट डी रिचेचेस इव्होल्युटिव्हज, पॅरिस आणि मीरा अदिती, म्हैसूर.