सुखोई एसयू-२४ ( नाटो रिपोर्टिंग नाव : फेन्सर ) हे सोव्हिएत युनियनमध्ये विकसित केलेले स्वनातीत, कोणत्याही हवामानात वापरता येणारे असे आक्रमक विमान आहे. या विमानाच्या पंखांचा कोन विमानाच्या गतीनुसार बदलता येतो. दोन जेट इंजिने असलेल्या या विमानात दोन वैमानिक शेजारी-शेजारी बसतात. एकात्मिक दिशादर्शन आणि आक्रमणप्रणाली असलेले हे सोवियेत बनावटीचे हे पहिले विमान होते. हे विमान रशियाची वायुसेना, सिरियाची वायुसेना, युक्रेनी वायुसेना, अल्जीरियाची वायुसेना आणि इतर अनेक देशांमध्ये कार्यरत आहे.

रशियन आरमाराचे एसयू-२४एम (२००१मध्ये)

सेवा इतिहास

संपादन
 
बेलारूसी वायुसेनेचे एसयू-२४एम

जुनी एसयू-२४ विमाने अझरबैजान, कझाकस्तान, रशिया आणि युक्रेनसह मोठ्या संख्येत सेवारत आहेत. २००८ च्या सुमारास रशियन वायु सेनेत ३२१ तर रशियन आरमारात ९४ विमाने होती. []

वापरकर्ते

संपादन
 
२०१५ च्या सुमारास एसयू-२४ वापरणारे देश (निळे) आणि पूर्वी वापरलेले देश (लाल)
 
रशियन वायुसेनेचे एसयू-२४एम२

रचना (एसयू-२४-एमके)

संपादन
 

यासारखी विमाने

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Directory: World Air Forces". Flight International. 11–17 November 2008. 11 October 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 August 2009 रोजी पाहिले.