प्रिमेरो नदी

(सुकुइया नदी या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रिमेरो नदी तथा सुकुइया नदी आर्जेन्टिनामधील नदी आहे. ही नदी कोर्दोबा शहरातून वाहते. तेथे नदीचे पात्र कालव्यासारखे बांधलेले आहे. तेथून पुढे ही नदी मार चिकिता या खाऱ्या पाण्याच्या सरोवरास मिळते.