सीमा राव यांना भारतीय मीडियामध्ये "वंडर वुमन ऑफ इंडिया" म्हणून ओळखले जाते.[१][२][३][४][५][६] राव या भारतातील पहिली महिला विशेष बल प्रशिक्षक आहेत.[७][८] त्यांनी भारताच्या विशेष दलांना दोन दशकांहून अधिक काळ विना मोबदला प्रशिक्षण दिले आहे. त्या क्लोज क्वार्टर बॅटल (CQB)[९] — आणि विविध भारतीय सैन्याला प्रशिक्षण देण्यात ती निपुण आहेत.[१०] त्या स्वतःच्या पती बरोबर; मेजर दीपक राव यांच्यासोबत भागीदारीत काम करतात.[११][१२]

डॉ सीमा राव कॉर्पस बॅटल स्कूल मध्ये

कारकीर्द संपादन

भारतीय स्वातंत्र्यसैनिक, प्रोफेसर रमाकांत सिनारी यांच्या पोटी जन्मलेल्या राव यांनी संकट व्यवस्थापनात एमबीए केले आहे.  त्या मिसेस इंडिया वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेची अंतिम स्पर्धक होत्या.[१३]

रावने भारतीय हवाई दलाच्या कोर्समध्ये स्कायडायव्हिंग करून पॅरा विंग्ज मिळवले. त्या एक लढाऊ नेमबाजी प्रशिक्षक, आर्मी पर्वतारोहण संस्था HMI पदक विजेता आणि लष्करी मार्शल आर्ट्समध्ये 8वी पदवी ब्लॅकबेल्ट प्राप्त कर्त्या आहेत.[१४] त्या जीत कुन दो शिकवण्यासाठी अधिकृत असलेल्या मूठभर शिक्षकांपैकी एक आहेत.[१५] राव यांनी पती दीपक राव यांच्यासमवेत क्लोज क्वार्टर्स कॉम्बॅटसाठी द राव सिस्टम ऑफ रिफ्लेक्स फायर नावाची शूटिंगची नवीन पद्धत शोधून काढली.[१६] १५,००० सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ योगदान दिल्याबद्दल राव यांना तीन लष्करप्रमुख सन्मानपत्रे मिळाली आहेत.[१७]

राव यांनी "एनसायक्लोपीडिया ऑफ क्लोज कॉम्बॅट ऑप्स" आणि "अ काँप्रिहेंसिव्ह ॲनालिसिस ऑफ वर्ल्ड टेररिझम" या दोन पुस्तकांचे सह-लेखन केले आहे. तसेच आपल्या पतीसोबत ‘हँडबुक ऑफ वर्ल्ड टेररिझम’ हे पुस्तकही लिहिले आहे.[१८]

पुरस्कार आणि ओळख संपादन

 
राष्ट्रपती राम नाथ कोविंद (उजवीकडे) सीमा राव (डावीकडे) यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करताना

राव ह्या २०१९ च्या फोर्ब्स इंडिया डब्ल्यू-पॉवर ट्रेलब्लेझर यादीत सहाव्या स्थानावर होत्या.[१९] त्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिन २०१९ रोजी तत्कालीन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता.[२०]

संदर्भ संपादन

  1. ^ "Wonder Woman: Dr Seema Rao, India's First And Only Woman Commando Trainer". femina.in (इंग्रजी भाषेत). 2022-03-16 रोजी पाहिले.
  2. ^ Pawar, Nivedita Jayaram (2017-06-25). "India's wonder woman". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2022-03-16 रोजी पाहिले.
  3. ^ LIV, SIpping Thoughts (2019-11-28). "Dr. Seema Rao- The Wonder Woman of India -". Sipping Thoughts Liv (इंग्रजी भाषेत). 2022-03-16 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ "The Maa-Beti Wonder Women: Seema and Komal Rao - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-03-16 रोजी पाहिले.
  5. ^ Says, Theskywalker (2017-10-29). "Interview with 'Wonder Woman' Dr. Seema Rao: "I hold honour and duty above material gains"". Star of Mysore (इंग्रजी भाषेत). 2022-03-16 रोजी पाहिले.
  6. ^ "Meet Seema Rao, India's first woman Commando trainer". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-08-16. 2022-03-16 रोजी पाहिले.
  7. ^ "Women Power: Dr. Seema Rao's Iron Will". jagran.com. 2019-03-14 रोजी पाहिले.
  8. ^ "IWD Special Interview of Dr. Seema Rao". bhaskar.com. 7 March 2019. 2019-03-08 रोजी पाहिले.
  9. ^ "Dr Seema Rao Commando Trainer". indiatimes.com. 2017-06-25 रोजी पाहिले.
  10. ^ "Training the Indian Forces". BBC News हिंदी. BBC. 25 January 2017. 2017-06-25 रोजी पाहिले.
  11. ^ "Indian Super Woman Dr. Seema Rao". Deccan Chronicle. 20 August 2016. 2016-08-21 रोजी पाहिले.
  12. ^ "Meet India's only woman commando trainer Dr Seema Rao". cnbctv18.com (इंग्रजी भाषेत). 14 June 2019. 2020-10-30 रोजी पाहिले.
  13. ^ "Dr Seema Rao - India's only commando trainer". indiatimes. 2016-07-11 रोजी पाहिले.
  14. ^ "Meet Seema Rao, India's Only Woman Combat Trainer". femina.in (इंग्रजी भाषेत). 2020-10-30 रोजी पाहिले.
  15. ^ "Jeet Kune Do Instructor - Dr Seema Rao". LokMarg. 19 December 2016. 2017-06-25 रोजी पाहिले.
  16. ^ "Forbes India - Dr Seema Rao: India's First Female Combat Trainer, Fighting Stereotypes". Forbes India (इंग्रजी भाषेत). 2021-12-26 रोजी पाहिले.
  17. ^ "Unstoppables Combat Couple". indiatoday.intoday.in. 2009-10-04 रोजी पाहिले.
  18. ^ "Men in uniform get a shot in the arm from combat couple | Mumbai News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). May 19, 2020. 2021-12-26 रोजी पाहिले.
  19. ^ "Dr Seema Rao is No 6 in the 2019 Forbes India Woman-Power". forbesindia.com. 2019-03-01 रोजी पाहिले.
  20. ^ "President gives Nari Shakti Puraskar, woman marine pilot, commando trainer receive loudest cheers". uniindia.com. 2019-03-08 रोजी पाहिले.