सिरॅमिक आर्ट
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
चिकन माती आणि इतर आवश्यक बाबींचे मिश्रण करून विविध प्रकारच्या वस्तु बनविन्याची ही सिरॅमिक आर्ट आहे. कलाकुसरीच्या वस्तु, भांडी, खेळणी, नक्षीदार मंदिरे, वेगवेगळ्या आकाराचे रंगिण मणी, रंगिण नक्षीदार कौले, मेजवर ठेवण्याच्या नक्षीदार वस्तु, विटा यांचा यात समावेश होतो. अनेक कला पैकी कुंभार कला ही एक अशी कला आहे की तिच्यात वस्तूला हवे तसे आकार देता येतात आणि हवी तशी नक्षीदार वस्तु तयार करता येते आणि त्या वस्तु दर्शनीय बनविता येतात.[१] यासाठी तो सूत आणि माती पासून चाक बनवितो. ते जमिनीवर एक आरी ठोकून त्यावर आडवे ठेवतो आणि माती व इतर मिश्रणाचा चिखल करून तो त्या चाकावर ठेवून त्याला गोल फिरवितो व गती देतो आणि हवी तशा आकाराची वस्तु बनवितो त्या वस्तु भट्टीत (आवा) भाजून विक्रीसाठी तयार करतो. कुंभार सुंदर वस्तु बनव ण्याबाबत काळजीपूर्वक खूप विचार करतात तसेच व्यावसायिक दृष्टीने दिमाखदार वस्तु कशा बनवता येतील शिवाय व्यवहारोपयोगी कशा बनवता येतील याचा विचार करतात. या कला कुसरीच्या किंवा इतर वस्तु बनविण्याचे काम स्वतंत्रपणे किंवा संघटित केले जाते. कुंभाराच्या कारखान्यात किंवा सैरमिक खारखान्यात संघटित लोक विक्रीला योग्य अशा वस्तूंचे आकार तयार करणे, दिमाखदार वस्तु तयार करणे ही कामे करतात. तयार झालेला कलात्मक माल कुंभाराच्या कारखान्यातील आहे अशी जाहिरात केली जाते.
सिरॅमिक हा शब्द ग्रीक केरमिकोस म्हणजे पोट्टेरी पासून आलेला आहे. नंतर त्याचे रूपांतर पोट्टेरीस क्ले मध्ये झाले आहे. अलीकडील आधुनिक काळात या कामात खूप बदल झाला. तांत्रिक नियोजन आत्मसात झाले त्याने निर्जीव, अधातुक वस्तूंचा उपयोग होऊ लागला आणि त्याला उष्णता देऊन पाघळवतात व त्यापासून वस्तु बनवितात.
इतिहास
संपादनकुंभार कला ही अतिशय पुरातन विकशीत संस्कृतिक कला आहे. या कलेच्या वस्तूंचे पुरातत्त्व माध्यमाने जपलेले कलात्मक वैविध्य अवशेष आत्ताच्या काळातही पाहावयास मिळतात. आफ्रिकेतील नोक येथे २००० वर्षापूर्वीच्याही वस्तु पाहावयास मिळतात. चायना, क्रेतान, ग्रीक, पॅरिस, मायन, कोरिया, या देशात आणि पच्छीमी देशात या संस्कृतिच्या कलात्मक बांबी पाहावयास मिळतात.
ही कला युरोप व वरील देशात पाहता येते तरीसुद्धा हिची सुरुवात पूर्व एशिया खंडात चायना, जपान या देशात प्रथम मातीची भांडी बनविण्याची कला सुरू झाली. आणि त्यानंतर वरील ठिकाणी अस्तीत्वात आली. त्यावेळी साधी पण वेगवेगळ्या आकारात भांडी बनवली जात होती. या कलेचा काल साधारण २००००-१००००BCE पूर्वीचा आहे. जियाङ्ग्क्षि परगण्यात क्षीयन्रेंडोंग गुव्हा मध्ये २०००० वर्षा पूर्वीचे कुंभार कलेचे अवशेष जतन केलेले आहेत.[२] १६ व्या शतकापर्यन्त चीन मधून कमी प्रमाणात महागडी चीनी मातीची भांडी युरोप खंडात आयात होत होती. १६ व्या शतकापासून युरोप मध्ये तशा भांड्यांची हुबेहूब नक्कल करून भांडी करणे इटली देशाचे फ्लोरेंस शहरात सुरू झाले. नक्षीदार वस्तूंची मागणी वाढली आणि त्यात मऊ मुलामा दिलेल्या तसेच आकर्षक भांड्यांची ही भर पडली. स्थानिक राज्यकर्त्याणे या कलाकारांना भांडवली सहाय केले.
जर्मनी मधील मातीची भांडी
संपादनजर्मनी मध्ये याचे उत्पन्न करणारे ४ कारखाने आहेत.[३]
ऑस्ट्रीया मधील मातीची भांडी
संपादनऑस्ट्रीया देशाचे विएना येथे सन १७१८ मध्ये याचे उत्पादन सुरू झाले आहे.[४]
रशिया मधील मातीची भांडी
संपादनसन १७४४ मध्ये रशिया मध्ये याचे उत्पादन चालू असल्याचे निदर्शनास आले.[५]
मेक्सिकन मातीची भांडी
संपादनमेक्सिको मध्ये पौराणिक पद्दतीने या कलाकुसरीच्या वस्तु बनविल्या जातात.
अमेरिकन मातीची भांडी
संपादनअमेरिकेत या वस्तु तयार करण्याचे ओजाई ,कॅलिफोर्निया, येथे कलाग्रह आहेत. ही कला प्राप्त करून घेण्यासाठी अमेरिकेत महाविध्यालये, विध्यपिठे, फाइन आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये या कलेचे शिक्षण दिले जाते.
संदर्भ
संपादन- ^ "कला मातीची भांडी उत्पादक आणि ग्राहक". रोजी मूळ पानापासून संग्रहित2008-06-02. 2016-09-15 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "चीन मधे जुने मातीची भांडी आढळले".
- ^ "नयमफेनबुर्ग मधील कुंभारकामविषयक कारखानाचा इतिहास".
- ^ "ओगार्तेन मधील अर्धपारदर्शक कुंभारकामविषयक संग्रहालय". 2016-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-15 रोजी पाहिले.
- ^ "भव्य अर्धपारदर्शक कुंभारकामविषयक: रशियन शाही अर्धपारदर्शक कुंभारकामविषयक इतिहास इ.स. १७४४ पासून १९१७ पर्यंत". 2016-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-15 रोजी पाहिले.